मुखेड:
तालुक्यातील पांडुर्णी येथील रहिवाशी प्रतीक माधव अंभोरे यांनी नीट परीक्षेत 720 पैकी 684 गुण घेऊन ग्रामीण भागामध्ये उज्वल यश संपादन केले आहे(UG NEET 2024 )त्यानिमित्त श्री गुरु नामदेव महाराज सार्वजनिक वाचनालय पांडुर्णीच्या वतीने प्रतीक आंबोरे यांचा सन्मान करण्यात आला. प्रतीक अंभोरे हा श्री गुरु नामदेव वाचनालयाचे उपाध्यक्ष कै. मारुती बाबुराव अंभोरे यांचे नातू तर ग्रामसेवक माधव मारुती अंभोरे यांचे चिरंजीव आहेत.
कुमारी आराध्या शिवराज वडजे ही शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्यामुळे तिचाही यावेळी सन्मान करण्यात आला. आराध्या वडजे ही केरबा पाटील वडजे मसलगेकर व मुख्याध्यापक मनोहर सूर्यवंशी यांचे नात आहे.
यावेळी केरबा पाटील वडजे मसलेकर, वाचनालयाचे सचिव मनोहर सूर्यवंशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीराम पाटील पांडुर्णीकर, दादाराव पाटील, मिलिंद लोहबंदे, रघुनाथ पाटील, संभाजी शिरसे पाटील, प्रभाकर कागदेवाड, प्रभाकर सूर्यवंशी, बापूराव पाटील, माधव अंभोरे, सुधाकर अंभोरे, नामदेव अंभोरे, दत्ता अंभोरे, राजू पाटील शिंदे, हरिबा शिंदे, श्रीमती नागरबाई अंभोरे, शोभा शिंदे, माणिक सूर्यवंशी, रामा बासरकर, जिजा सूर्यवंशी, बाबाराव सूर्यवंशी, सौरभ सूर्यवंशी, व्यंकटराव अंभोरे, रामदास सूर्यवंशी, शंकर सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध परीक्षेमध्ये नैपुण्य मिळवल्यानंतर श्री संत नामदेव महाराज सार्वजनिक वाचलेल्या तर्फे सन्मान करण्यात येतो यामध्ये श्रीराम पाटील पांडुर्णीकर बालाजी पाटील सूर्यवंशी, मनोहर सूर्यवंशी व कार्यकारी मंडळाचा सहभाग असतो.