कंधार : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, उपसेवा केंद्र कंधार यांच्यातर्फे विश्व पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन ओम शांती केंद्रामध्ये करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत प्रामुख्याने ‘प्लास्टिक प्रदूषण का समाधान’, ‘एक झाड एक जीवन’, ‘जल ही जीवन है ‘ आणि वायु प्रदूषणाला कमी कसे करता येईल, इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.
त्यानिमित्य ब्रह्माकुमारी ज्योती बहीनजी यांनी आपल्या जीवनामध्ये झाडे किती उपयोगी आहेत तथा वर्तमान काळात आपल्या जीवनामध्ये पाण्याचे किती महत्व आहे त्याचबरोबर निसर्गाला सशक्त शुद्ध करण्यासाठी प्लास्टिकचे प्रदूषण कसे टाळता येईल यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी डॉक्टर लक्ष्मीकांत पेठकर, बीके सतीश भाई, बीके शिवराम पांडागळे भाई, बीके ओंकार भाई, बीके साईनाथ भाई, आयुष बच्चेवार, बंकवाड सर, गौरव, साईनाथ,महाजन, बीके शकुंतला माता, बीके चंद्रकला माता, बीके कमल माता, बीके पद्मावती रहाटकर माता, बीके सुनंदा गोंड माता, अनुसया माता, मीरा माता तेलंग, संगीता माता जायभाये, डॉक्टर डांगे मॅडम, मीरा, अश्विनी बच्चेवार, नम्रता, नंदिनी, ईश्वरी, श्रावणी, जान्हवी, इत्यादींनी सहकार्य देऊन कार्यक्रम संपन्न केला.