शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या शाळेत करण्यात आला.श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संस्थेतील मातृशाळा दि.१६ जुन १९५३ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार,विद्रोही विचारवंत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब आणि माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब यांच्यासह शेकडो सहकार्याच्या मदतीने आरंभ केला
शिक्षक म्हणून,स्वतः डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब,भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब भाई राजेश्वरराव आंबटवाड, भाई पंढरीनाथराव कुरुडे,भाई शिवाजीराव बोधगीरे आदींनी विद्यार्थ्यांना ज्ञानदेण्याचे कार्य केले होते.मातृ शाळा श्री शिवाजी हायस्कूल कंधार या शाळेचा प्रवास जयराम राहटे यांचा वाडा गवंडीपार,हतईपूरा,आणि हु.माणिकराव काळे रोड कंधार असा झाला.या ज्ञानालयाचा ७१ वर्धापन दिन आहे.सध्या या संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब, सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब, सहसचिव अँड मुक्तेश्वर केशवरावजी धोंडगे साहेब आणि शालेय समिती अध्यक्ष प्रा.लिलाताई आंबटवाड यांनीही आजच्या वर्धापन दिनानिमित्त सदिच्छा देऊन मानाची जयकांति केली.
आजच हा वर्धापन दिनानिमित्त आदरणीय सदाशिवराव आंबटवाड सर यांनी पर्यवेक्षक आनंदराव भोसले सर उपप्राचार्य मुरलीधर घोरबांड,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षिका आणि शिक्षकेतर बंधु-भगीनीं,विद्यार्थी, विद्यार्थीनी अन् पालक दैनिक सकाळ कुरुळा पत्रकार चिवडे यांचे गुलाब पुष्प देवून सत्कार व अभिनंदन केले.