कंधार ; आपल्या देशात पर्यटन आणि देव दर्शनास खुप महत्व आहे.प्रत्येक जण दीपावली व ऊन्हाळी सुट्यात भारत दर्शन करण्याचा बेत अनेकजण आखतात.यंदा आम्ही दोघे दत्तात्रय गोपाळराव एमेकर (पती)सौ.संगीतादत्तात्रयएमेकर(पत्नी) मुलगा कुमार दृष्टांत संगीता दत्तात्रय एमेकर व मुलगी कुमारी दृष्टी संगीता दत्तात्रय एमेकर चौघे जण पर्यटन करण्यास दि.२१ मे २०२४ रोजी आमचा प्रवास ईस्टला गाडीने आरंभ झाला.
मल्लिकार्जुन श्रीशैल्यम्, महानंदा,गोविंद पट्टनम्,तिरुमला,मदुराई मिनाक्षी मंदिर, रामेश्वरम् केरळ ठेवली करत कोकण मार्ग येत असतांना कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्हा तालुका भटकल येथील मुरुडेश्वर शिवाचे भव्य मंदिर अरबी समुद्र किनारी एक पर्यटनाचे सुंदर ठिकाण पाहण्याचा योग आला.विश्वातील सर्वात विशालकाय दुसऱ्या क्रमांची भगवान शंकराची मुर्ती पाहता आली.हे शिवमंदिर २००८ रोजी पूर्ण त्या झाले.या शिवमंदिराची तब्बल २४९ फुट ऊंच आहे.या मंदिराच्या रामायणात पौराणिक कथेनुसार शिवभक्त रावणाने शिवाचे आत्मलिंग करुन अमरत्व मिळविण्या दृष्टीने रावणाने आत्मलिंग स्थापना केली होती.
ते आत्मलिंग स्थापन केलेले आपल्या बरोबर लंकेत घेवून जातांना आत्मलिंग या आरत समुद्राच्या काठाच्या जमीनीवर ठेवले.पण त्यास नष्ट करण्यासाठी त्यावर वस्त्र पांघरले म्हणून त्यास म्रिद्रेश्वर असे नामकरण झाले.त्याचा अपभ्रंश होवून मुरुदेश्वर असे झाले.या मुरुदेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार स्थानिक व्यापाऱ्याने केले.या मंदिराच्या प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूस हुबेहूब हातीच्या ऊंची एवढे हातीशिल्प जणुकांही ते आपले स्वागत करत आहेत असा भास होतो.तेथील विशालकाय भगवान शंकाराची मुर्ती शिवमोग्गा येथील शिल्पकार काशिनाथ व त्यांच्या शिल्पकलावंत साथीदारांच्या सहकार्याने दोन वर्षांत पूर्ण करुन भगवान शंकराची भव्य आकारल्या गेली त्यास तत्कालीन पाच कोटी रुपये खर्च आला. आर.एन शेट्टीने पुढाकार घेऊन या शिवमुर्तीचे कार्य पूर्ण करण्यास हातभार लावला.या देखण्या पर्यटन केंद्राला भेट देणे म्हणजे देवदर्शन अन् पर्यटन दर्शन घेण्याचा सुवर्ण योग समजावा.
अरबी समुद्राच्या तटावर स्थित भगवान शंकराचे मुरुदेश्वर तीर्थक्षेत्र अप्रतिमच!
येथील समुद्र तट खटकाळ आणि पुळण अशा दोन्हीही प्रकारचा आहे.तेथील पुळणवर जिथे सागरा धरणी मिळते,तिथे तुझी मी वाट पाहते. या गीताच्या ओळी नक्कीच पाहणाऱ्यांच्या ओठांवर पुटपुटल्या शिवाय कोणीही स्वस्थ बसत नाही.या पुळण क्षेत्रात अगदी सागरी पाण्याच्या किनारी सुमुद्रस्नान करण्याची इच्छा तिव्र झाल्याने आमच्या इर्टिगा गाडीचे मालक व सारथी संतोष गीते कंधारेवाडीकर,आणि सारथी संजय केंद्रे या दोघांच्या हिमतीवर मला सागरी पाण्यात आंघोळीचा अनोखा अनुभव आला.
सागराची एखादी लाट येताच मी अगदी अलगत तरंगु लागलो.आणि पायाखालची पूळणची वाळू सरकू लागली.पाणी क्षारयुक्त खारट असल्याने अंग खाजेल याची भीती होती.पण त्या सागरी पाण्याचा मुळीच त्रास झाला नाही.माझी ही अविस्मरणीय क्षणचित्रे कुमार दृष्टांतने आपल्या कॅमेर्याने सुरेख टिपली आहेत.जय मुरुदेश्वर, जय भालेराव,जय पर्यटन!
दत्तात्रय गोपाळराव एमेकर