कंधार ;(दिगांबर वाघमारे )
कौठा दरोडा प्रकरणातील आरोपींना पोलिस प्रशासनाने तीन दिवसांत अटक करावे अन्यथा सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे यांनी कौठा येथील दरोडा पिडित गजानन येरावार यांच्या कुटुंबीयांची भेटीनंतर बोलताना केले.
कंधार तालुक्यातील कौठा येथे नुकतेच दोन दिवसांपूर्वी गजानन येरावार या व्यापाऱ्यांच्या घरावर दरोडेखोरांने सशस्त्र दरोडा टाकुन ४० तोळे सोने व २२लाख ऐवज लंपास केले आहे. कौठा येथे घटना स्थळांची पाहणी करून गजानन येरावार यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे सर यांनी घेऊन घटनेची माहिती घेतली.
यावेळी प्रा.मनोहर धोंडे म्हणाले की येरावार कुटुंबीयांनी धीर धरावा आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ . कौठा दरोडा प्रकरणातील आरोपीवर पोलिस प्रशासनाने दरोडा व मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी जर पोलीस प्रशासनाने तीन दिवसांत कौठा दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक केली नाही तर सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे सर यांनी दिला आहे.