नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन 

 
नांदेड – समकाळातील शिक्षणविषयक समस्या आणि चालू शैक्षणिक वर्षापासून लागू होत असलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे एस. सी., एस.टी., ओबीसी तसेच धार्मिक अल्पसंख्याक यांच्यावर होणारे परिणाम यासंबंधीचे चिंतन करण्यासाठी नांदेडात एकदिवसीय राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन सोमवार १७ जून २०२४ रोजी करण्यात आले आहे. या परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय शोषित पिछडा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार हे राहणार असून भारतीय शिक्षण व्यवस्थेचे अभ्यासक फारुख अहमद यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मराठवाड्यातील सुप्रसिध्द उद्योजक बालाजी इबितदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
           शहरातील शिवाजी नगर येथील नाना नानी पार्क नजिकच्या विसावा पॅलेस काॅन्फरन्स हाॅल मध्ये सकाळी १० वा परिषदेचे उद्घाटन होईल. त्यानंतर पीअर फाऊंडेशनचे डॉ. हेमंत कार्ले यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे सत्र संपन्न होईल. या सत्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० : हीत कुणाचे? या विषयावर छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड आपले अभ्यासपूर्ण विवेचन करतील. भोजन अवकाशानंतर दुपारी २.३० वा. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२०  आणि उच्चशिक्षण: एक दृष्टिक्षेप या विषयावर यशवंत महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. कविता सोनकांबळे ह्या आपले चिंतन मांडणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी फुले – शाहू- आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक तथा लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे यांची उपस्थिती राहणार आहे. 
         चौथ्या सत्रात दुपारी ४.०० वा प्रश्नोत्तरे, चर्चा तसेच शैक्षणिक संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हे शेवटचे सत्र असून या सत्रात परिषदेतील सहभागी शिक्षक प्राध्यापकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील. यावेळी एस. जी. माचनवार, प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड, प्रा. डॉ. कविता सोनकांबळे यांची उपस्थिती राहणार आहे. सदरील परिषदेला पूर्ण वेळ उपस्थित राहण्याचे आवाहन प्रज्ञाधर ढवळे, सतिशचंद्र शिंदे, संजय मोरे, श्रीमंत राऊत, राजेश चिटकुलवार, माधव कांबळे, संजय मोरे, निरंजन तपासकर, पांडुरंग कोकुलवार, मारोती कदम, शंकर गच्चे, बाबुराव कापसे, रविंद्र बंडेवार, दिलीप काठोडे, नागोराव डोंगरे, कैलास धुतराज,  रणजित गोणारकर, चंद्रकांत कदम यांच्यासह संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *