रोज नवीन BF ….

…… How Romantic ना..फक्त कल्पना करा आणि हेल्दी आणि आनंदी रहा… मला रोज नवनवीन Bf आवडतो .. सगळ्यात बदल हवा मग यात का नको… आयुष्यात मज्जा आणायची असेल आणि रोज तोचतोच पणा नको असेल तर मग रोज नवा Bf हवाच.. तुम्हीही ट्राय करा.. असं का पहाताय.. मी काही चुकीचं थोडीच सांगतेय.. कलीयुग आहे भाऊ.. घ्या घ्या आनंद घ्या.. राधे राधे..
आज वाटतं तो गुळाच्या सांज्यासारखा गोड हवा .. मग माझं काय चुकलं ??साजूक तुपासारखा हेल्दी पण नाजूक नको.. बदामासारखा प्रोट्रीनयुक्त आणि केशरयुक्तही हवा. रोज नव्या .Bf चा सहवास हवा मग त्यासाठी तयारीही तशीच हवी ना .. कडु , तिखट , आंबट , गोड सगळ्या चवी चाखता यायलाच हव्यात..
दुसऱ्या दिवशी bf हवा अगदी चमचमीत एखादी झणझणीत मिसळीसारखा.. त्याने डोळ्यात पाणी आणलं तरी चालेल पण प्रेम फक्त त्याच्यावरच .. आयुष्यात अनेक ठेचा खाल्ल्या तरीही ठेचा आवडतोच… त्यामुळे कधी थालीपीठसोबत झणझणीत ठेचाही बरा वाटतो.. रोज काय ते गुळमुळीत बोलणं तसच रोज काय गुळमुळीत खाणं.. त्याचाही एकाच दिवसांत कंटाळा येतो.. त्याच्या तिखटपणामुळे अंगाची लाहीलाही होते… सारखं पाणी पिउन तहान शमवावी लागते.. पाण्याने तहान शमवावी लागत असेल तर असा bf काय कामाचा. पावसाळा आला कि याला जास्त जवळ करावं वाटतं.. खुप प्रेम करावं वाटतं. पण हा वात आणतो यार.. पण तरीही त्याच्या क्रंचीनेसमुळे तो आवडतोच..
आता मलाही रोज नवीन bf ची सवय लागली आहे.. बदलाशिवाय करमतच नाही .. कारण प्रत्येकातुन काहीना काही वेगळं मिळतं.. एकाच प्रकारच्या bf मधे सगळं कसं मिळेल ना.. तुम्ही मला आंबटशौकीन म्हणाल पण कैरीच्या लोणच्याची बरणी पाहिली की जसं तोंडाला पाणी सुटतं ना तसं त्यालाही पाणी सुटतं.. त्यामुळे त्याला वेळेवर ओठापाशी न्यावं लागतं नाहीतर त्याचं पाणी पिण्यात कोणाला इंटरेस्ट आहे.. तो आंबट झाला की साखरेला जवळ करावं लागतं..
मग तर त्या bf चा फियॅस्को होतो.. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशा विचारांची मी त्यामुळे रोज नवीन Bf हवाच..
वाचून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं का ??.. पाणी सुटलं तरच नविन काहीतरी घडु शकतं.. वाचताना कोणाकोणाला वाटलं , मीही रोज नविन Bf करणार.. अहो ,करायलाच हवा ना.. मी ब्रेकफास्टबद्दल बोलतेय हा..
तुम्हाला काय वाटलं ?? .. Bf चा अर्थ तुम्ही बॉयफ्रेंड असा नाही ना घेतला.. काल सकाळी ओट्स केले होते .. त्याचा फोटो मी आमच्या गृपवर शेअर केला .. आणि लिहीलं होतं Todays Bf ..
त्याच्या खाली मित्राने लिहीलं , सोनल यावर लिही.. तुम्हाला जर यात काही चावटपणा आढळला तर तो मित्राचा आहे बरं का.. आणि चांगले काही दिसले तर ते माझे.. कारण मी पुणेकर आणि तो मराठवाड्यातला..
यातला विनोद आपण बाजूला ठेवु पण खरच मित्रा मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.. कारण नाहीतर हे असं लिहायला सुचलच नसतं.. तुम्ही वाचक आहात म्हणुन मी रोज सगळे जॉनर ट्राय करु शकते.. विनोदी लिखाण अवघड आहे पण तुमच्यामुळे सोप्पं वाटतं.. अजब लग्नाची गजब गोष्ट नावाचं मी कमर्शीयल नाटक करत होते तेही आठवलंआणि स्वतः सीरीयस राहून दुसऱ्याला हसवणं किती कठीण असतं हेही अनेकदा जाणवलं..बऱ्याच जणाना विनोद झेपतच नाहीत आणि त्यानंतर आपलाच विनोद होतो.. त्यामुळे बोलताना खुप सावध रहावं लागतं.. आणि लिहीताना तर त्याहूनच.. हसा आणि रोज नवीन Bf करा.. कारण नाविन्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही.. पानगळती होवुन नवीन पालवी येते तेव्हा मन नव्याने प्रफुल्लित होतं..तसच रोज नवीन Bf ठेवील निरोगी.. मी यात नकळत अनेक पदार्थांचा उल्लेख केला आहे.. तुम्हाला कुठले पदार्थ यात दिसले ते कमेंटमधे जरुर लिहा..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *