श्री स्वामी समर्थ केंद्र मुखेड पर्यावरण प्रकृती विभागाच्या वतीने सुलोचना आरगुलवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

मुखेड: (दादाराव आगलावे)

श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) केंद्र मुखेड पर्यावरण प्रकृती विभागाच्या वतीने सुलोचना आरगुलवार यांच्या पुढाकारातून आजपर्यंत असंख्य वृक्षारोपण व त्याचे संगोपन करण्यात आलेले आहे. त्यामुळे सुलोचना आरगुलवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सुलोचना आरगुलवार या श्री स्वामी समर्थ केंद्र मुखेड येथील सेवेकरी असून त्या पर्यावरण विभागाच्या प्रमुख आहेत. आज पर्यंत त्यांनी बसस्थानक, अनेक शाळा, रुग्णालय, तहसील परिसर, पंचायत समिती परिसर येथे जाऊन त्या वृक्षारोपण केलेल्या आहेत.

केवळ ते वृक्षारोपण करत नसून त्याचे संगोपन होते की नाही तेही पाहतात. त्यांना मुखेड केंद्रातील सेवेकऱ्यांचे भरीव सहकार्य असते. परवा मुखेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाणे येथे जाऊन त्यांनी वृक्षारोपण केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *