खडंकी अष्टभुजादेवी माता मंदिर कंधार येथे वटवृक्ष,फुलांचे रोप वाटून वटपौर्णिमा उत्साहात साजरी

 

कंधार ; प्रतिनिधी

एक फेरा आपल्या आरोग्यासाठी हे ब्रिद घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सलग दहा वर्षापासून चिखलीकर कुटुंबीयांच्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने खडंकी अष्टभुजादेवी माता मंदिर कंधार सर्व माता-भगिनींसोबत स्नेहपूर्ण वटवृक्ष,फुलांचे रोप वाटून अतिशय आनंदी उत्साही वातावरणात वटपौर्णिमा सौ . प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या पुढाकारातून साजरी करण्यात आली.

तसेच सिद्धी विनायक मिलिटरी कॅम्प येथे वटवृक्षारोपण करण्यात आले.प्रारंभी अष्टभुजा देवी मातेचे मनोभावे दर्शन घेऊन आरती करण्यात आली.

यावेळी भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष औरादकर ताई,कल्पनाताई गीते,संजीवनी ताई गाडे,वंदना डुमणे, सुनंदा वंजे,भावना दापशेटवार, प्रणिता पापीणवार,संध्याताई राठोड,देऊताई गोरे यांच्यासह शेकडो महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी सौ .प्रणिता देवरे चिखलीकर यांनी मार्गदर्शन केले

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *