कंधार ;बाचोटी (ता.कंधार) येथील माळावर ट्रॅक्टर उलटून मृत्यू पावलेल्या कंधार येथील चालक गणेश सटवा बेळे याच्या कुटुंबीयाला प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांच्या प्रयत्नाने रामदासजी कन्ट्रक्शन कडून सहा लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. गणेशच्या पत्नीला २१ जून रोजी रकमेचा धनादेश देण्यात आला.
सद्या कंधार-बाचोटी रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम गुरु रामदासजी कंट्रक्शनकडून होत आहे. गणेश सटवा बेळे (रा.आसान नगर कंधार) हा ट्रॅक्टर घेऊन येत असताना १५ एप्रिल रोजी रोडच्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाला व त्यात गणेशचा मृत्यू झाला होता. या रस्त्यावरुन प्रा. पुरुषोत्तम धोंडगे जात होते. त्यावेळी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बहाद्दरपुऱ्याचे माजी उपसरपंच पंडित पा.पेठकर यांच्या मदतीने त्यांनी गुरु रामदासजी कंट्रक्शनचे गुत्तेदार दीपसिंग फौजी यांच्याशी संपर्क साधून मयत बेळे याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला.
वेळेच्या कुटुंबातील मुले आणि पत्नीला मदत मिळावी म्हणून पुढाकार घेतला. प्रा. धोंडगे यांनी मयत कुटुंबातील मुलांचे बारावीपर्यंत संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी गुरु रामदासी कंट्रक्शन नांदेड यांच्याकडे या कुटुंबाला मदत मिळावी म्हणून वारंवार पाठपुरावा करून मयत गणेश बेळे यांच्या कुटुंबाला सहा लाख रुपयाचा धनादेश मिळवून दिला.
२१ जून रोजी प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी मयताची पत्नी श्रीमती संगीता बेळे यांना सहा लाख रुपयाचा धनादेश मिळवून दिला. प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे हे सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी गुरु रामदास कंट्रक्शनचे प्रतिनिधी ईश्वर सिंग धनसिंग लोहिया हनुमंत रामा साखळी प्रकाश वाघमारे पंकज बेळे, बालाजी साखळे सचिन वाघमारे शिशुपाल जोंधळे अनिल बेळे पंडितराव पेटकर माधवराव पेटकर माधवराव भालेराव योगेश रासवंत मनोज नखाते कृष्णा भालेराव मयताचा भाऊ माणिक बेळे व सुनील बेळे उपस्थित होते.