कंधार ( दिगांबर वाघमारे)
दि.२१ जुन रोजी शुक्रवारी पहाटे ब्रम्हमुहुर्तावर संत नामदेव महाराज मंगल कार्यालय कंधार येथे योग शिक्षक श्री नीळकंठ मोरे सरांच्या प्रेरणेने 10 वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
पतंजली योग समिती कंधार, तहसील व उपविभागीय कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी कंधारचे सौ.अरुणाताई संगेवार, तालुक्याचे तहसीलदार रामेश्वरजी गोरे , नायब तहसीलदार सौ. रेखाताई चामणर, तसेच पं.स.चे गटशिक्षणाधिकारी, श्री संजयजी येरमे यांनी आज मोठ्या उत्साहाने एक दिवसीय योग शिबीराचे आयोजन केले होते.
प्रामुख्याने आयोजन नियोजनाची पुर्ण तयारी ही नीळकंठ मोरे सर यांनी केली होती. सकाळी साडेपाच वाजता ब्रह्मकुमारी ज्योती बहेनजी,यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रार्थना करुन योग साधनेची सुरूवात करण्यास आली. सूक्ष्म व्यायाम, योगा जॉगिंग,विविध योगासने, प्राणायाम मध्ये भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम – विलोम,बाह्य प्राणायाम,अग्निसार व उज्जायी, ध्यान धारण इत्यादी उपस्थित योगसाधकांकडून करून घेत त्याबद्दल माहिती दिली.
आहार, विहार,अष्टांगयोग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.या वेळी तहसील कार्यालय चे कर्मचारी,योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आणि संगेवार मॅडमनी पण साधकांना आरोग्याविषयी योगसाधनेचे महत्व पटवून दिले.कर्मचारी वर्गाला निरंतर योगदान मिळावे त्यासाठी मोरे सरांना विनंती केली. तसेच संजयजी येरमे सर व रामेश्वरजी गोरे सर यांनी ही साधकांना योगसाधनेचे महत्व पटवून दिले.
तसेच कंधार येथील न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती व अभिवक्ता संघ कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.यावेळी पतंजली योग समिती कंधारचे तालुका प्रभारी योगशिक्षक नीळकंठ मोरे यांनी जवळजवळ एक तास योगशिबीर घेऊन येथोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांकडून योग दिनानिमित्त संकल्प म्हणून घेतला.
त्यावेळी ए. ए. पंचभाई, जिल्हा न्यायाधीश -2, श्री आर.आर राऊत दिवानी न्यायाधीश व स्तर,कंधार, एम.बी.साखरे मॅडम -3 रे सह दिवाणी न्यायाधीश कंधार, व अधिवक्ता संघाचे अध्यक्ष यू् पी वाघमारे व दिगांबर गायकवाड, जेष्ठ विधिज्ञ बालाजीराव पांचाळ, सरकारी वकील महेश कागणे, सर्व अभिवक्ता संघ सदस्य व सर्व वकील मंडळी उपस्थित होते.