मनोविकास विद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक परमेश्वर बोड्डावार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार

 

कंधार ; प्रतिनिधी

कंधार येथिल मनोविकास विद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक परमेश्वर मारोतराव बोड्डावार यांचा आज दि.२९ जुन रोजी सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सरनाईक व्ही व्ही ह्या होत्या .

परमेश्वर मारोतराव बोड्डावार यांनी सुमारे ३५ वर्ष प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून सेवा बजावली . या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनोविकास पतसंस्थेचे चेअरमन संग्राम पुलकुंडवार , जेष्ठ शिक्षिक पी ए पतंगे , चंद्रकांत मामडे आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वर घोडेकर यांनी केले . यावेळी बोडावार परिवार सदस्य नातेवाईक , आजी माजी कर्मचारी व्यापारी , डॉक्टर मित्रपरिवार आदी बहुसंख्येने उपस्थित होते .

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *