प.पु.संतश्रेष्ठ गुरुवर्य श्री संत साधु महाराज मठ संस्थान कंधारची परंपरा व संक्षिप्त इतिहास

 

कंधार ; 
कंधार ही नगरी राष्ट्रकुट कालिन राज घराण्याची उपराजधानी म्हणुन प्रसिद्ध असली तरी ही प. पु. संतश्रेष्ठ गुरुवर्य श्री साधु महाराज यांच्या पदस्पर्शाने पुणीत झाल्या मुळे कंधारला वेगळी ओळख निर्माण झाली.प.पु.साधु महाराज यांचा जन्म इ.सन. १७०८ ते १८१२ या कालावधीत कानडखेड ता.पुर्णा जि. परभणी येथे पैठणचे संतश्रेष्ठ गुरुवर्य एकनाथ महाराज यांचा दुसरा अवतार समजत. त्यांना प्रत्यक्ष दत्त प्रभुंनी मंत्रदीक्षा दिली. अशी अख्यायिका आहे.

साधु महाराज यांचे मुळ नाव हनुमंत रामजीपंत देशपांडे होते. कंधारचा राजा जयसिंह यांनी साधुमहाराजांना कंधारला आणले. त्यांची वृत्ती साधु सारखी होती म्हणुन त्यांना सर्वचजण साधु महाराज नावाने ओळखत. साधुमहाराज म्हणजे पंढरपूरच्या श्री पांडुरंगाचे व त्रिमूर्ती श्री दत्तात्रयांचे निस्सीम भक्त उपासक होते. पंढरपुरला नित्याने वारकऱ्यांची पायी दिंडीची पध्दत रुढ केली. श्री संत साधुमहाराजांपासून पंढरीच्या पायी वारीची परंपरा मध्यंतरी निझामी राजवटीत कांही प्रमाणात कमी झाली होती. ती परंपरा शंकर महाराज व त्यांचे थोरले बंधू सीताराम महाराज यांनी पुन्हा सुरू केली. १९५४ साली कंधारहून पंढरपूरला दिंडी सोहळ्याने पायी वारी करण्याची परंपरा पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केली.

या पायी वारीच्या टाळ-मृदंगाच्या विठ्ठल नामाच्या जयघोषाच्या वाटचालीत गावोगावी जाऊन कीर्तन- प्रवचने या माध्यमांतून संतांच्या वाणींचे लोकमानसावर दृढ संस्कार होत असत.त्यांच्या सात पिढ्यावर भगवान श्री दत्तात्रय महाराजांचा वरदहस्त होता. प.पू साधु महाराज यांची संजीवन समाधी उमरखेड जि.यवतमाळ येथे असून कंधार नगरीत वंदनीय साधुमहाराज यांची वस्त्रसमाधी आहे. त्यांचे उत्तराधिकारी प.पु.श्री भास्कर महाराज, प.पु.श्री ऋक्मानंद महाराज, प.पु.श्री यशवंत महाराज, प.पु.श्री हनुमंत महाराज, प.पु.श्री धुंडीराज महाराज, प.पु.श्री सिताराम महाराज, यांच्या समाध्या मठ संस्थान मध्ये आहेत.प.पु.श्री साधु महाराज कंधार यांनी किल्ल्यात प्रधान म्हणून ही कांही काळ काम केले. साधु महाराज यांना दृष्टांत देवून महाजन यांच्या शेतातील शिवेवरील श्री गणपती प्रगट झाले. अशी अख्यायिका सर्वपरिचित आहे.

 

संस्थानची आठवी पिढी चालू असून विद्यमान मठाधिश, संस्थानाधिपती गुरुवर्य ह.भ.प.एकनाथ महाराज आहेत. संस्थानचा त्यांच्या अधिपत्याखाली चालतो.ह.भ.प.श्री साधुमहाराज संस्थानचे दोन मठ श्री क्षेत्र पंढरपुरात आहेत. साधु महाराजांचे सातव्या पिढीचे वंशज यांच्या कुळात शंकर महाराज यांचा जन्म झाला. संत एकनाथ महाराजांनंतर लोकजागृतीचे कार्य करणारी जी संतपरंपरा निर्माण झाली, त्यात कंधारचे प्रसिद्ध संत साधुमहाराज हे होते. साधुमहाराजांपासून सातव्या पिढीचे शंकर महाराज यांनी भागवतधर्मपरंपरेला उजाळा दिला.शंकर धुंडिराज साधू, उपाख्य शंकर महाराज यांचा जन्म फाल्गुन वद्य ३, शके १८४४ रोजी कंधार (जि. नांदेड) येथे धुंडिराज महाराज व मथुराबाई या धर्मशील दाम्पत्याच्या पोटी झाला. महाराजांचे शालेय शिक्षण अल्पच होते. संस्कृत भाषा, व्याकरण, साहित्य, वेद- वेदान्ताचे त्यांनी सखोल अध्ययन केले. वेदशास्त्रसम्पन्न गोविंदशास्त्री देवणीकर यांच्याकडे महाराजांनी संस्कृतचे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर नांदेड येथे महामहोपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांनी ‘काव्यतीर्थ’ ही पदवी संपादन केली.

संस्कृतच्या अध्ययनानंतर महाराज चतुर्मासात पंढरपूर येथे राहून ते माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर नित्य प्रवचन, अनेक वेदांत ग्रंथराजावर निरुपण करीत. गुरुवर्य ह.भ.प.शंकर महाराज कंधारकर यांनी स्वतःच्या विदवत्तेच्या बळावर ग्रंथ संपदा लेखन करुन जगभर किर्तीध्वजा फडकवून वारकरी संप्रदायाच्या आभ्यासू जनांनी त्यांची ग्रंथ संपदेचा आभ्यासासाठी वापर केला.

कंधार येथे त्यांचे स्मारक मंदिर आहे.कंधार येथील साधुमहाराज यांची ही पारंपारिक दिंडी ह.भ.प.गुरुवर्य एकनाथ गुरु साधु महाराज यांच्या पुढाकाने दिंडी मिती ज्येष्ठ कृ.८ १९४६ दि.२९ जुन २०२४ रोजी कंधारहून निघुन लोहा,माळेगाव, अहमदपूर, चापोली,धरणी,लातूर, साकरा,मुरुड,तडवळ, येडशी,धारी,बार्शी,कुरडवाडी, आरण, आष्टी मार्गे पंढरपूर येथे मिती आषाढ शु.८ शके १९४६ दि.१४ जुलै २०२४ रोजी पोहचणार आहे.

पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात गरुड खांबास चांदीचा मुलामा (पत्रा) साधु महाराज संस्थानच्या प्रयत्नांने व कंधार येथील मनोहराव महाजन दानशूर व्यापारी शिष्याच्या अर्थ साह्याने मढविण्यात आला.साधु महाराजांचे संपुर्ण जीवन चरित्र “साधुसुधा” या पहावयास मिळेल. साधुमहाराज यांचा शिष्य परिवार महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांत सर्वत्र आहे. ही माहिती साधुमहाराजांचा सातवा वंशज ह.भ.प.श्री ओंकारनाथ (तात्या) महाराज कंधारकर यांनी दिली आहे.

 

श्री संत साधु महाराज संस्थान कंधार ही या संस्थानचे सदभक्त शिषोत्तम स्व. शिवाजीराव केंद्रे यांचे कडून संकलन सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार दत्तात्रय एमेकर परिवार क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता कंधार.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *