पाल टाकुन पोट भरत असलेल्या कंधारच्या व्यापा-यांना पालीका प्रशासनाने उठवले ; मोहिमेला एमआयएम चा विरोध

 

(कंधार : दिगांबर वाघमारे )

कंधार शहरा मधील मुख्य रस्त्यावरील व्यापारांची अतिक्रमण म्हणून आज दि.२७ जुन रोजी दुकाने पाडुन पालीका प्रशासनाने आपले काम केले असले तरी त्या दुकान दारांसह त्यांच्या घरच्यांना उपासमारीची वेळ आली आहे . या घटनेचा पालीका प्रशासनाचा कंधार
एमआयएम ने आपला विरोध दर्शवत त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली.

 

 

कंधार शहरा मधील मुख्य रस्त्यावरील व्यापारांची दुकाने पाडुन जवळपास १२ वर्षाचा कालावधी झालेला आहे. तेव्हां पासुन आज पर्यंत कोणतेही व्यापारी संकुलन बांधण्यात आले नाही. महाराणा प्रताप चौक येथे व्यापारी संकुलन बांधण्यात आले आहे परंतु ते चालु करण्यात आले नाही.

कंधार शहरा मधील मुख्य रस्त्यावर छोटे मोटे व्यापारी पाल टाकुन धंदा करुन आपले व आपल्या कुटूंबाचे पोट भरत आहेत. असे असताना कंधार शहरा मधील राजकारणा वरुन रस्त्यावर पाल टाकुन पोट भरत असलेल्या व्यापा-यांना उठविण्यासाठी कंधार येथील नगर पालिके तर्फे ११ वाजे पर्यंत रस्त्यावरील पुर्ण छोटे मोटे व्यापारी पाल टाकुन बसलेले त्यांनी ते काढुन घ्यावे म्हणुन सुचना दिली होती . त्यानुसार कार्यवाही झाली .

 

जर रस्त्यावरील छोटे मोटे व्यापारांचे दुकाने काढले तर त्यांचे कुटूंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. मुख्य रस्त्यावर १०x१० चे तात्पुरते किंवा कायमचे गाळे बांधुन भाडेतत्वावर तयार करुन नगर पालिकेने दयावे व त्याची रक्कम व्यापा-यांकडुन वसुल करण्यात यावे. असे निवेदन मुख्याधिकारी , नगर परिषद कार्यालय कंधार, यांना
हमेदुद्दीन अहमदुद्दीन एमआयएम तालुकाध्यक्ष कंधार जि. नांदेड. यांनी दिले .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *