बार्टी मार्फत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त “सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह “अंतर्गत अभिवादन

 

परभणी;डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था यांचे समतादूत प्रकल्पाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दि.२६ जून ते ०२ जुलै २०२४ या कालावधीत ‘सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह’साजरा करण्यात येत आहे.

बार्टी समतादूत प्रकल्पाच्या वतीने शासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय जिल्हा रुग्णालय सभाग्रह येथे प्राचार्या श्रीमती अलका मानकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहू महाराजांचे जीवन व कार्य या विषयावर घनश्याम साळवे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांनी केले. यावेळी छत्रपती शाहू यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकतांना श्री घनश्याम साळवे म्हणाले छत्रपती शाहूंनी स्वत्:च्या सुखाकडे लक्ष न देता रयतेच्या सुखासाठी आपले आयुष्य समर्पित केले,मागासलेल्या व अस्पृश्य समाजाला पुढे आणण्यासाठी सामाजिक न्यायाचे तत्व आमलात आणले,तो वारसा पुढे नेण्याची आज गरज आहे असे घनश्याम साळवे यांनी विचार मांडले समतादूत यांनी बार्टी व समाज कल्याण विभागांच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन माहिती श्री विनोद पाचंगे,विद्या मेश्राम,अमित कांबळे यांनी दिली.

तसेच महाविद्यालयाचे मार्गदर्शक प्रा.सुशिलकुमार जाधव,श्रीमती.शिरसाठ,श्री.दहैतकर,श्री.ढाकणे,श्रीमती.भद्रे यांचे सह प्रशिक्षण महाविद्यायलयातील उपक्रमातील सहभागी विद्यार्थी कोमल मस्के,नेहा कदम,आरती चव्हाण,वैष्णवी सोगे,रेष्मा जाधव यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले यासह समतादूत प्रकल्पाचे वतीने जिल्हयातील शालेय व महाविद्यालय स्तरावर “सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह “अंतर्गत प्रश्न- मंजूषा,पथनाट्य,निबंध स्पर्धा व अभिवादन इत्यादी उपक्रमासह आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत विनोद पाचंगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार समतादूत अमित कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *