दहा दिवसात विस्थापित व्यापाऱ्यांना तिन वर्षासाठी जागा भाड्याने मिळवुन देणार. प्रा.मनोहर धोंडे.

 

शिवालयात विस्तापित व्यापाऱ्यांची बैठक.

(कंधार ; दिगांबर वाघमारे )

अतिक्रमणाच्या नावाखाली कंधार शहरातील संपूर्ण बाजारपेठ काढून टाकली असल्याने व्यापारी हा देशोधडीला लागला आहे. कंधार शहरातील बस स्थानक ते शिवाजी चौकापर्यंत एकच मुख्य रस्ता असल्याने याच रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे. यातील काही मोठे व्यापारी हे स्थायिक झाले आहेत परंतु विस्थापित छोट्या व्यापाऱ्यांना दुकान नसल्याने मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. शहरात मोठा रस्ता असेल परंतु बाजारपेठ नसेल तर शहराचे महत्व कसे वाढणार हा खरा प्रश्न आहे. रस्त्याच्या बाजूला व्यापाऱ्याने टाकलेली छोटी दुकाणे नगरपालिकेने अतिक्रमण म्हणून पुन्हा पाडून टाकली असल्याने सामान्य व्यापारी हा रस्त्यावर आला आहे. या व्यापाऱ्यांनी प्रा. मनोहर धोंडे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. यावर प्रा. मनोहर धोंडे यांनी दहा दिवसात नगर पालीकेच्या मालकी असलेली जागा तिन वर्षासाठी भाड्याने मिळवुन देणार असल्याचे अश्वासन सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी बैठकीत बोलताना दिले.

नगरपालिकेच्या वतीने विस्थापित व्यापाऱ्यांचे प्रत्येक वेळी अतिक्रमण काढले जात असल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. यावर काहीतरी पर्याय व्यवस्था काढा यासाठी व्यापाऱ्याने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. मनोहर धोंडे यांनी विस्थापित व्यापाऱ्यांना कायद्यानुसार दहा बाय दहा ची जागा भाडेतत्त्वाने मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले.

प्रा. मनोहर धोंडे पुढे बोलताना म्हणाले की, राजकीय लोकांच्या हिव्या दिव्या पोटी कंधार शहराचे वाटोळे झाले आहे. मला कोणतेही राजकारण करायचे नसून येणाऱ्या काळात छोट्या व्यापाऱ्यांना त्यांचा व्यापार करता यावा यासाठी भाडेतत्त्वावर जागा मिळवून द्यायची आहे. शॉपिंग सेंटर जेव्हा बांधकाम होईल तेव्हा होईल परंतु छोटा व्यापारी जगला पाहिजे यासाठी मी पुढाकार घेणार असून उद्या तीन वाजता जिल्हा अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून पुढील प्रक्रिया सुरू करणार आहे. या ठिकाणी या व्यापाऱ्यांना न्याय नाही मिळाल्यास मी मंगळवारी ते बुधवारी मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे. व्यापाऱ्यांनीही कोणत्याही आपोआवर विश्वास न ठेवता मी स्वतः दहा दिवसात जागा मिळवून देईल असे आश्वासन सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख मनोहर धोंडे यांनी दिली आहे.

या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते शेख हब्बुभाई,सुनील बासटवार, मोहम्मद हमीदोद्दीन,मधुकर मुसळे, उमाजी पंदलवाड,ॲड शेख मोहदिन,ॲड शेख मगदुम,प्रविण महाजन, ईंजी शेख आदील,शिकूर चौधरी, विशाल बासटवार, गणेश कदम, संदीप व्यास ,यासह अनेक विस्थापित व्यापारी उपस्थीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *