सौ.आशाताई शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षांमध्ये जाहीर प्रवेश

 

(लोहा  प्रतिनिधी )

लोहा शहरातील इंदिरानगर येथे  रविवार दिनांक 30 जून रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद बैठक संपन्न झाली, यावेळी आशाताई शिंदे यांच्या हस्ते महादेवाची सर्वप्रथम पूजा करण्यात आली, यावेळी उपस्थित वडार समाज बांधवांच्या वतीने आशाताई शिंदे यांचा पुष्पहार, शाल ,श्रीफळ व फटाके फोडून भव्य सत्कार करण्यात आला, यावेळी इंदिरानगर लोहा येथील शेकडो कार्यकर्ते, महिला भगिनींनी आशाताई शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला,

 

यावेळी उपस्थितीत इंदिरानगर येथील कार्यकर्त्यांना संबोधित करताना आशाताई शिंदे म्हणाल्या की,इंदिरानगर येथील महादेव मंदिर, सभा मंडप, या भागातील रस्ते, नाली, पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज, घरकुल व इतर मूलभूत अनेक समस्या लवकरात लवकर लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून सोडवल्या जातील व इंदिरानगर च्या सर्वांगीण मूलभूत विकासासाठी आमदार शामसुंदर शिंदे सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी आशाताई शिंदे यांनी यावेळी इंदिरानगर येथील जनसंवाद बैठकीत बोलताना सांगितले,

 

 

यावेळी पारडी चे माजी सरपंच दिगंबर पाटील डिकळे, लोहा तालुका समन्वय समिती सदस्य सिद्धू पाटील वडजे, खरेदी विक्री संघाचे संचालक सुधाकर पाटील सातपुते, शेतकरी कामगार पक्षाचे लोहा तालुका अध्यक्ष नागेश पाटील हिलाल, संजय गांधी निराधार योजना समितीचे लोहा तालुका सदस्य अशोक सोनकांबळे, वडार समाजाचे लोहा तालुका अध्यक्ष ईरबाजी पवार, माजी नगरसेवक रावसाहेब मंजलवाड, बालाजी डीकळे, सरपंच संदीप पाटील पौळ, विशाल पाटील कौशल्य, प्रणव वाले, अशोक बोधगिरे, सटवाजी डिकळे, किशन मंजलवाड, दुलबा दिंडे, पिराजी पवार, शंकर लिंबोळे, हनुमंत पवार, किशन मंजलवाड, व्यंकटी मंजलवाड, बालाजीराव डिकळे, संदीप डिकळे, जितेंद्र मंदावाड सह महिला भगिनी , व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *