कंधार ; प्रतिनिधी
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी सामाजिक बांधिलकी जपत येथील श्री संत साधू महाराज संस्थानच्या पायी दिंडीला दि २९ जुन रोजी रथासाठी एक लाख रुपय प्रदान केले. कंधार येथून दर वर्षी पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्थान होत असते. या मानाच्या दिंडीला सातशे वर्षाची परंपरा आहे.
संस्थानचे आठवे वंशज मठाधिपती गुरुवर्य एकनाथ महाराज साधू यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २९ जून रोजी दुपारी साधू महाराजांच्या मठातून या पायी दिंडीचे प्रस्थान पंढरपूरकडे केले. या दिंडीत कंधार तालुक्यातील अनेक ठिकाणचे वारकरी मोठ्या आनंदाने विठू नामाचा गजर करीत सहभागी झाले .ही दिंडी लोहा तालुक्यातील किरोडा येथील गुराखीगडावर पोहचल्यावर दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी वारकऱ्यांचे चहा फराळ करून स्वागत करण्यात आले.
प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी साधू महाराज कंधारकर व वारकरी संप्रदाय विषयी असलेली श्रद्धा जपत साधू महाराजांच्या दिंडीला रथासाठी एक लाख रुपये दिले. दिवंगत डॉ.भाई केशवराव धोंडगे यांची वारकरी साप्रदायबद्दलची असलेली श्रद्धा व निष्ठा जोपासण्याचं कार्य आणि परंपरा प्रा.पुरुषोत्तम धोंडगे जोपासत आहेत.