कै वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कंधार शहरात पारंपारिक वेशभुषेत मिरवणूक

 

(कंधार ; दिगांबर वाघमारे )

१ जुलै रोज सोमवारी हरीत क्रांतीचे प्रणेते ,वसंतराव नाईक यांची जयंती कंधार शहरात मोठ्या उत्साहात पारंपारिक वेशभुषेत मिरवणूक काढून साजरी करण्यात आली .

शहरातील माईचे मंदीर येथून सदर मिरवणूक सुरुवात झाली. ठिकठिकाणी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले . सदर मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौक , महाराणा प्रताप चौक मार्ग भवानीनगर कमानी समोरून , बसस्टॅण्ड समोरून , नामदेव महाराज सभागृह येथे समारोप झाला .

 

 

बालब्रम्हचारी हरीसिंग महाराज शिवपुर कमलनगर जिल्हा बिदर कर्नाटक , बंजारा क्रांतीदल अध्यक्ष देविदास भाऊ राठोड , शिवसेना नेते एकनाथ पवार , वंचित बहुजन आघाडीचे शिवाभाऊ नरंगले ,
ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय पवार, शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव एल.के .जाधव, पंचायत समितीचे सदस्य उत्तम चव्हाण, सुंदरसिंग जाधव, सुरेश राठोड , भगवान राठोड , संदीप चव्हाण , आदीसह मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *