नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी बलभीम शेंडगे यांचे बिनविरोध निवड

 

मुखेड: महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटना मराठवाडा अध्यक्षपदी बलभीम शेंडगे यांची बिनविरोध निवड श्रीराम मंगल कार्यालय खोपोली जि. रायगड येथे नुकतीच करण्यात आली.
माजी अध्यक्ष मारोती गायकवाड हे सेवानिवृत्त झाल्यामुळे मराठवाडा अध्यक्ष पद रिक्त होते. रायगड जिल्ह्यातील श्रीराम मंगल कार्यालय खोपोली येथे नुकतीच राज्य स्तरीय सर्वसाधारण सभेचे आयोजित करण्यात आले होते. त्यात मुखेड येथील कर्मचारी जिप्सीभूषण बलभीम शेंडगे यांची राज्याध्यक्ष सुरेश पोस्तांडेल यांच्या सूचनेनुसार कोअरकमिटी सदस्य विश्वनाथ घुगे व माजी अध्यक्ष मारोती गायकवाड यांनी बलभीम शेंडगे यांची बिनविरोध निवड करत असल्याची घोषणा केली. यावेळी उपस्थितांनी बलभीम शेंडगे यांना अनुमोदन दिले.

 

यापूर्वी बलभीम शेंडगे यांनी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटना नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष पद अनेक वर्ष अत्यंत प्रभावीपणे सांभाळले. आपल्या कार्यकालात त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. या कार्याची दखल घेऊन राजाध्यक्ष सुरेश पोस्तांडेल यांनी बलभीम शेंडगे यांची मराठवाडा अध्यक्षपदी निवड केली. ही निवड अत्यंत विचारपूर्वक करत असल्याचे पोस्तांडेल
यांनी शुभेच्छा संदेशात नमूद केले आहे.

बलभीम शेंडगे यांचे राज्य कोषाध्यक्ष लालू सोनकांबळे, राज्य सरचिटणीस अनिल पवार, धर्माजी खिल्लारे, रामेश्वर वाघमारे, सतीश देशमुख, वैजनाथ स्वामी, मार्तंड वनंजे, जितेंद्र ठेवरे, बालाजी माळसापुरे, गणेश मदने, सुभाष मीरावार, दिलीप वाघमारे, शिंदे यांच्यासह तहसीलदार राजेश जाधव, मुख्याधिकारी आशितोष चिंचाळकर, मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे, डॉ. अशोक कोरवार, डॉ. रामराव श्रीरामे, डॉ. पांडुरंग श्रीरामे, अभियंता उत्तम नारलावार, संतोष साबदे, शिवशंकर कुच्चेवाड, रफिक बागवान, अशोक इंद्राळे, तेजराव गायकवाड, गौरव जाधव, सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, अशोक कोत्तावार, दादाराव आगलावे, जय जोशी, बालाजी तलवारे वैजनाथ दमकोंडवार राजेश भागवतकर, गोविंद पाटील, नामदेव श्रीमंगले, उमाकांत डांगे, ईश्वर फुलवळकर, पिराजी जगताप, परमेश्वर काचमोडे, पापुले नायगावकर, कैलास गायकवाड तसेच मुखेड व नांदेड जिल्ह्यातील कर्मचारी,मित्रमंडळींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *