माहिती अधिकार संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्षपदी सतीश बळवंतकर

( बिलोली) नागोराव कुडके


      माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी येथील दै.सामनाचे ता.प्रतिनिधी व बहुभाषिक पञकार संघाचे बिलोली तालुका सचिव  सतीश बळवंतकर यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख जाकीर यांच्या हस्ते नुकतेच नियुक्ती पत्र देऊन करण्यात आले आहे.   

◼️बिलोली येथील   सतीश बळवंतकर हे मागील काळापासुन वार्ताहर, सामाजीक,शैक्षणिक,सांस्कृतीक क्षेत्रात कार्यरत आहे.त्यांच्या या कार्याची दखल माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख जाकीर यांनी घेतली.केंद्र व राज्य शासनाच्या जनहिताच्या विविध कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावाणी आणि व्यापक प्रसार व प्रसारासाठी निस्वार्थ कार्य करत आहेत.

म्हणून त्यांची माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य च्या बिलोली तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे.या वेळी माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. शेख जाकीर,संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष पवन बोरा,जिल्हाअध्यक्ष प्रविण कानघुले,उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल मौलाना अहेमद बेग ईनामदार,माधव दंतापल्ले, बहुभाषिक पञकार संघाचे अध्यक्ष शेख फारूख अहेमद, जेष्ठ पञकार ए.जी.कुरेशी,हाई पटेल, शेख युनूस कासराळीकर , लक्ष्मण शेट्टीवार,यादव लोकडे,मोहसीन खान,शिवराज रायलवाड यांच्या सह अनेकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

https://youtu.be/FxX8i7AIJPA

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *