आपल्या भारतात खूप महान लोक होउन गेले.ज्यांनी भारताच्या प्रगतीमध्ये खूप मोलाची कामगिरी बजावत इतिहासाच्या सुवर्णपानावर आपले नाव कोरले.या महान व्यक्तीमत्वापैकी एक म्हणजे मोक्षगुंडम विश्वश्र्वरैय्या हे आहेत.१५सप्टेंबर १८६० या दिवशी
मोक्षगुंडम विश्वश्र्वरैय्या यांचा जन्म झाला.तो दिवस आपल्या भारतात”अभियंता दिवस”म्हणून साजरा केला जातो.लहानपणापासुनच त्यांना कुशाग्र बुध्दिमत्ता लाभली होती.विश्वश्र्वरैय्या यांनी केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातच नव्हें तर उद्योग,अर्थ,नगरसुधार इ.कार्यात मोलाचे योगदान केले आहे.समर्थ भारत हे त्यांचे स्वप्नं होते.त्यांना भारतसरकारने भारतरत्न हा सर्वाच्च किताब बहाल केला.त्यांना आधुनिक भारताचे विश्वकर्मा देखील म्हणतात.ब्रिटीशांनी पण त्यांना जनहिताच्या कार्यामूळे”नाईट कमांडर आॅफ दी आर्डर आॅफ दी इंडीयन एंपायर”या पुरस्काराने सन्मानित केले.
विश्वश्र्वरैय्या यांचे वडिल श्रीनिवास शास्त्री हे संस्कृतचे विद्वान होते.त्यांचे निधन झाले तेव्हा विश्वश्र्वरैय्या हे केवळ पंधरा वर्षाचे होते.वडिलांच्या निधनामूळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.त्यामूळे ते कुर्नुल येथून मुद्देनहळ्ळी ला आले.उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले.ते १८८१साली मद्रास येथून उच्चक्षेर्णीत परिक्षा उतीर्ण झाले.स्थापत्य अभियांत्रिकीचे पुढील शिक्षण त्यांनी काॅलेज आॅफ इंजिनीअरींग पुणे येथे घेतले.१८८३मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर त्यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नौकरी केली.
डाॅ.विश्वश्र्वरैय्या यांनी कर्नाटक राज्यात आधुनिकतेच्या अधितंत्रज्ञानाचा
प्रसार करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.भारत पारतंत्र्यात असतांना त्यांनी तिथे कृष्णसागर बांध,भद्रावती स्टील वर्क,मैसूर तेल आणि साबण कंपनी या कंपन्यांची स्थापना केली.बॅक आॅफ मैसूर सारख्या प्रतितयश बॅकेची उभारणी त्यांच्याच प्रयत्नांतून शक्य झाली.त्यांच्या या भरीव योगदानामूळे त्यांना”कर्नाटकचे भगीरथ”ही पदवी मिळाली आहे.वयाच्या तिसाव्या वर्षी कुक्कुर भागाला सिंधूनदीचे पाणी पुरवण्याची योजना तयार केली.तसेच अनेक ठिकाणी धरण बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत डाॅ.विश्वश्र्वरैय्या यांचे मोलाचे योगदान आहे.
देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे.आणि”अभियंता दिन”व्यापक अर्थाने अधिक अर्थपूर्ण पध्दतीने साजरा होण्याची आज आवश्यक्ता आहे.जागतिक पातळीवरील इंडस्ट्रियक डेव्हलपमेंटमध्ये भारतीय अभियंत्यांचा मोलाचा सहभाग आहे.प्रगत राष्ट्र घडवायचे असल्यास “इंजिनियरिंग रिसर्च आणि इनोव्हेशन्स”हा विकासाचा एकमेव मार्ग आहे.
आज अभियंता दिनानिम्मित सर्व अभियंत्यांना हार्दिक शुभेच्छा..!
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१