आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अथक प्रयत्नामुळे मौ.कौठा येथील अडीच कोटी रुपये कामाच्या पुलवजा कोल्हापुरी बंधाराच्या कामास सुरुवात

(कंधार – दिगांबर वाघमारे )

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कौठा व परिसरातील हजारो गावकरी व शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कंधार तालुक्यातील मौजे कौठा येथील मानार नदीवरील पूलवजा कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामाची सुरुवात शुक्रवार दिनांक 05 जुलै रोजी लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या उपस्थितीत या पूल वजा बंधाऱ्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी आकाश माळवे, उपविभागीय अभियंता उत्तम गायकवाड सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत मौ. कौठा वासियांची हा बंधारा नसल्याने मोठी अडचण होत होती, कौठा व परिसरातील अनेक हजारो गावकरी व शेतकऱ्यांना हा पुलवजा बंधारा नसल्यामुळे शेती कामासाठी व दळणवळणासाठी या भागातील शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना वेळोवेळी करावा लागत असल्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या निदर्शनास आले असता आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मौजे कौठा येथे पूल वजा कोल्हापुरी बंधारा होण्यासाठी मंत्रालय स्तरावर अतिशय तळमळीने पाठपुरवठा करून पुलवजा बंधारा मानार नदीवर होण्यासाठी शासन स्तरावरून अडीच कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून आणून या कामाचे उद्घाटन आमदार शिंदे यांनी काही दिवसाखाली केले होते, प्रत्यक्ष या पूल वजा बंधाराच्या कामास काही विघ्न संतोषी राजकारण्यांनी नाहक विरोध करून राजकीय द्वेषापाई विरोध करून या बंधाऱ्याचे काम थांबवले होते पण सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांचे लोहा कंधार मतदारसंघातील देवदूत, विकास पुरुष ,भागीविधाते म्हणून ओळखले जाणारे

 

लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आपली मंत्रालय स्तरावर पूर्ण ताकद लावून कंधार तालुक्यातील मौ. कौठा येथील मानार नदीवरील पूल वजा कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामास स्वतः आमदार शिंदे उपस्थित राहून या पुल वजा बंधाऱ्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात केली.

मृद व जलसंधारण विभाग नांदेडच्या वतीने हा पुलवजा बंधाऱ्याचे काम होणार असून आमदार शामसुंदर शिंदे यांनी मृद व जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देऊन मौ. कौठा येथील पुलवजा बंधारा हा दर्जेदार व नियम अटीनुसार करण्याचे आदेश देऊन सदरील बंधाऱ्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची कदापि गय केली जाणार नसल्याचे उपस्थित अधिकाऱ्याना सूचना केल्या. यावेळी कौठावासीया सह कंधार लोहा तालुक्यातील हजारो शेतकरी नागरिकांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे आभार मानून कौतुक केले.

 

 

+++++++

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *