माजी केंद्रीय गृहमंत्री, स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

 

कंधार : प्रतिनिधी

देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज दि.१४ जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबुलगा तालुका कंधार येथे डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले,

यावेळी लोहा कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद पाटील तेलंग, बहाद्दरपुरा युवक काँग्रेस सर्कल प्रमुख वसंतराव पाटील घोरबांड, माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ देवकांबळे गोविंदराव पाटील टेंभुर्णे उपसरपंच सचिन गुद्दे, शालेय समिती अध्यक्ष सदाशिव बडुरे, मुख्याध्यापक एम.एम पांचाळ, रंजित पाटील तेलंग, पोलिस पाटील प्रकाश देवकांबळे, भिमराव पाटील नागरगोजे, बालाजी वडजे, ग्रामपंचायत सदस्य किरण वाघमारे, आयुफ्फ पठाण, भीमराव देवकांबळे आदींसह गावातील नागरिक व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

छाया – विनोद महाबळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *