कंधार ; प्रतिनिधी.
कंधार शहरातील व्यापाऱ्यांची बाजारपेठ पाडून जवळपास 13 वर्षे होत आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधीने ज्या पद्धतीने व्यापार पेठ बसण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे त्या पद्धतीने केले नसल्याने आजही व्यापारी हतबल आहे. रस्त्याच्या बाजूने शेड मारून व्यापारी व्यापार करत असतानाही नगरपालिकेच्या वतीने वारंवार त्यांचे अतिक्रमण काढून टाकले जात असताना शहरातील विस्थापित व्यापारी हे माझ्याकडे आले होते. यावर मार्ग काढून नगरपालिकेच्या मोकळ्या जागा दहा बाय दहाची जागा देण्यासाठी मी पाठपुरावा केला. यामुळे शहरातील विस्थापित व्यापारी हे अत्यंत खूष आहे. परंतु काही लोक हे काम मीच करणार असल्याचा वाव आणत आहेत. यात मला पडायचे नसून मला राजकारण करायचे नाही. व्यापाऱ्यांचा पोटाचा प्रश्न मिटत असेल तर याचे श्रेय कोणाला घ्यायचे ते आणि घ्यावे. विघ्न आणू नये असे प्रतिपादन सेवा जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख प्रा.मनोहर धोंडे यांनी केले.
कंधार येथील प्रा. मनोहर धोंडे यांच्या सेवा संपर्क कार्यालयात विस्थापित व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन व्यापाऱ्याच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीला सेवा जनशक्ती पक्षाचे पक्ष प्रमुख प्रा. मनोहर धोंडे हे उपस्थित होते
यावेळी बोलताना प्रा. मनोहर धोंडे म्हणाले की मतदार संघाचा विकास करण्यासाठी नेत्यामध्ये जिद्द व धमक असली पाहिजे. मी साधा ग्रामपंचायत सदस्य नसतानाही महाराष्ट्रातील विविध भागात अडीचशे कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे. माझ्यापाशी काम घेऊन येणारा कोणताही व्यक्ती. मी नाराज करत नसून त्यांचे काम केल्याशिवाय स्वस्त बसत नाही. दहा दिवसांपूर्वी कंधार शहरातील विस्थापित व्यापारी हे माझ्याकडे आले होते. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली असल्याने मी व्यापाऱ्यांना दहा बाय दहाची जागा भाडेतत्त्वावर दहा दिवसात मिळवून देईल असे आश्वासन दिले होते. यासाठी मी व्यापाऱ्यांना सोबत घेऊन पाठपुरावा केला. जागा देण्याच्या संदर्भात प्रक्रिया पूर्ण झाली आहे.परंतु येथील काही पुढारी हे काम मी केल्याचे सांगत आहेत. माझा अशा लोकांना एक प्रश्न आहे की तेरा वर्षे तुम्ही काय केले हे व्यापाऱ्यांना आता चांगलेच माहित झाले आहे.
मला कोणत्याही कामात राजकारण करायचं नाही ज्यांना या कामाचे श्रेय घ्यायचे आहे त्यांनी खुशाल घ्यावे परंतु होत असलेल्या कामात विघ्न आणू नये. अशी प्रतिपादन प्रा.मनोहर धोंडे यांनी केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते हब्बूभई,मिर्झा जफर बेग, एजाज पटेल, स्वप्निल बासटवार, मधुकर मुसळे,शेख हैदर यासह कंधार शहरातील सर्व विस्थापित व्यापारी उपस्थित होते
.