नांदेड : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री डी पी सावंत यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच डॉ. शंकराव चव्हाण स्मृती ग्रीन मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे .महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला . तीन वयोगटात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत 11 ते 18 वयोगटातून अमन कुमार, सोळा वर्षावरील महिला गटात भारती तर 18 वर्षावरील पुरुषांच्या गटांमध्ये रिंकू सिंगने बाजी मारली आहे . या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठवाड्याचे भाग्यविधाते , देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्रद्धेय कै. डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त माजी पालकमंत्री डी.पी . सावंत यांच्या संकल्पनेतून डॉ. शंकराव चव्हाण स्मृती ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली . 16 वर्षावरील महिलांसाठी पाच किलोमीटर, 11 ते 18 वयोगटातील मुलांसाठी पाच किलोमीटर तर 18 वर्षावरील पुरुषांच्या खुल्या मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या . राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सकाळी हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धेला सुरुवात झाली. महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार , आयोजक डी.पी सावंत , माजी आमदार अमरनाथ राजूरकर, श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
डॉ. शंकरराव चव्हाण पुतळा येथून सुरुवात झालेली ही स्पर्धा अण्णाभाऊ साठे चौक , वसंतराव नाईक चौक , आनंद नगर, भाग्यनगर, वर्कशॉप कॉर्नर, राज कॉर्नर, शेतकरी पुतळा ,छत्रपती चौक , मोर चौक , छत्रपती शाहू महाराज पुतळा, रेस्ट हाऊस, आयटीआय चौकाकडून पुन्हा डॉक्टर शंकरराव चव्हाण पुतळा येथे समाप्त करण्यात आली. या स्पर्धेत राज्यातील कानाकोपऱ्यातून धावपटू सहभागी झाले होते .
अत्यंत रोचक ठरलेल्या या स्पर्धेत 11 ते 18 वर्ष मुलांचा गटातून अमन कुमार हे विजेते ठरले. तर नवरत्न हरियाणा दुसरे , लकी समर्थ नागपूर तिसरे , आवेश चव्हाण यवतमाळ चौथा तर सुरज विजय राठोड संभाजीनगर हा पाचव्या क्रमांकाच्या बक्षिसांचा मानकरी ठरला. पाच किलो मिटर लांबीच्या 16 वर्षे वरील महिला गटाच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या मानकरी ठरल्या त्या भारती. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे विजेत्या ठरल्या रिन्की धन्या पावरा , तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या प्रणाली संजय शेगावकर , चौथ्या स्थानावर विजेत्या ठरल्या आश्विनी बाबासोहब तुर्कीझाडे तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिताली भोयर हिने पटकावले. 18 वर्षावरील पुरुषांच्या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत रिंकू सिंग यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. दुसरे क्रमांक अभिषेक कामना देवकते , तिसरा क्रमांक मिळवला तो अरुण राठोड , चौथ्या स्थानावर बाजी मारली प्रदुम्न नासिल यांनी तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस हरिदास शिंदे यांनी पटकावले. विजेत्या सर्व धावपटूंना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या हस्ते बक्षीस , प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आयोजक तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी .पी. सावंत यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा , एडवोकेट निलेश पावडे,
उद्योजक कमल कोठारी, कौस्तुभ फरांदे, विवेक राऊतखेडकर, दीपक पाटील, अतुल वाघ, अविनाश कदम, दीपक पाटील ( को ) आदित्य देवडे लहानकर, शशिकांत शिरसागर,नागोराव आढाव, संतोष मुळे, राहुल देशमुख तरोडेकर, श्याम पाटील कोकाटे, सुभाष पाटील, गंगाधर कदम, सतीश बसवदे, श्याम आढाव, त्रिंबक कदम, सुषमा थोरात यांच्यासह पंच महोदय आदी उपस्थित होते. तिन्ही गटातील ग्रीन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पंचानी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत हा निकाल तयार केला.
तरुण देशाची संपत्ती : खा. अशोकराव चव्हाण
श्रद्धेय शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रीन मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्रसह अनेक राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तरुणाई अत्यंत जिम्मेदार असायला हवी . कारण तरुणच या देशाची संपत्ती आहेत असे मत माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. शंकरराव चव्हाण यांनी यांच्यामुळे मराठवाडा आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला आहे . राज्याच्या विकासामध्ये शंकरावजींचे योगदान अतुलनीय असेच राहिले आहे . शंकरावजींच्या कार्याचा इतिहास तरुण पिढीसमोर सतत असावा या उद्देशाने डी.पी . सावंत यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या ग्रिन मॅरेथॉनला मी शुभेच्छा देतो . असेही यावेळी खा. अशोकराव चव्हाण म्हणाले.
डॉ. शंकरराव चव्हाण ग्रीन मॅरेथॉन राज्यात नावलौकिक मिळवेल : डी.पी. सावंत
माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण ग्रीन मॅरेथॉन स्पर्धेला महाराष्ट्रसह विविध राज्यातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ग्रीन मॅरेथॉन राज्यासह देशापतीलवर नावलौकिक मिळवणारी आणि धावपटूंना एक नवी संधी देणारी ठरेल असा विश्वास आयोजक माजी मंत्री डी पी सावंत यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की ,ज्याप्रमाणे संगीत शंकर दरबार ने देश पातळीवर एक आपली स्वतंत्र सांगीतिक ओळख निर्माण केली आहे .त्याच धर्तीवर डॉ .शंकरराव चव्हाण ग्रीन मॅरेथॉनही राज्य आणि देशपातळीवरती आपला वेगळा ठसा उमटवेल असेही यावेळी डी.पी. सावंत म्हणाले.