कंधार : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी विचारवंत साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या ५५ व्या स्मृती दिनानिमित्त गुरूवार दि.१८ जुलै रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव साठे नगरच्या वतीने शहरातील साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृत्ती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्त साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव साठे नगर यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी. उपस्थित जयंती मंडळाचे उपाध्यक्ष साईनाथ मळगे, कोषाध्यक्ष कैलास कांबळे, बाबुराव टोम्पे, मारोती पंढरे, निरंजन वाघमारे, महेश मोरे, विकास कांबळे, संदीप मळगे,सरोज मोरे, दिग्विजय कांबळे, विकास गायकवाड, आकाश घोडजकर,साई जोगले, बाळू गायकवाड, प्रदीप गडंबे,दत्ता मोरे, बालाजी मळगे, आदींची उपस्थिती होती.