तेविसाव्या अमरनाथ यात्रेमध्ये दिलीपभाऊ ठाकूर यांच्यासोबत सहभागी झालेल्या यात्रेरात्रकरुंचे मनोगत या भागात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
*कुमार कुलकर्णी , मनपा वार्ड ऑफिसर*
पाहता पाहता, अमरनाथ यात्रा परतीचा चा शेवटचा टप्पा दोन ते तीन तासात येईल, ज्यांना ज्यांना जवळ च्या स्टेशन हून सोयीस्कर होईल ते उतरत आहेत, सगळ्यांनी केलेल्या सहकर्या बद्दल मनापासुन आभार, कळत नकळत काही चूक झाल्यास, कोणाचे मन दुखावले असल्यास आम्ही उभयतां दिलगिरी व्यक्त करतोत, आपले प्रेम स्नेह असाच वृद्धिंगत व्हावा हीच अमरनाथ चरणी प्रार्थना,
विशेषतः श्री दिलीप भाऊ यांचे विशेष आभार, त्यांच्या उत्कृष्ट नियोजन, दांडगा संपर्क, गोड वाणी आणि आत्मविशवासाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच, बाबा बर्फानी तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो, असेच सत्कार्य तुमच्या हातून घडो हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना, पुढच्या प्रकल्पात आम्ही निश्चितच सहभागी होवूत
*जयमाला लटपटे, गंगाखेड*
मी एकटीच जात असल्यामुळे मनात भीती होती की कसे होईल आपले. पण दिलीपभाऊंनी संपूर्ण टूरचे वातावरण इतके कौटुंबिक ठेवले की, सर्वजण एका परिवारातील सदस्यच झालो. दिलीप भाऊच्या यात्रेत कोणतीही महिला बिंदासपणे एकटी जाऊ शकते याची मी अनुभवावरून खात्री देते.
*अंजली कुलकर्णी ,हैदराबाद*
टूर मध्ये येण्यापूर्वी एकाही व्यक्तीची वैयक्तिक ओळख नसताना इतका चांगला टूर होईल याची स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती. नामवंत टूर कंपन्यापेक्षा दिलीप भाऊंच्या टूरचा अनुभव जगावेगळाच. रात्री सर्वात उशिरा झोपून देखील सर्वात आधी तयार होणारे दिलीपभाऊ सारखे व्यक्तिमत्व लाखोत एक असते. यात्रेतील सुरेखाताई चे सहकार्य मला खूप भावले. सर्वच यात्रेकरू माझी वैयक्तिक काळजी घेत असल्याबद्दल शतशः ऋणी आहे सगळ्यांची.
*संगीता जाधव,वसमत*
साधारण दहा पंधरा दिवस आपण सगळेजण एका कुटुंबाप्रमाणे यात्रेच्या निमित्ताने एकत्र आलो .खूप परिचय झाला खूप ओळखी वाढल्या. सर्वांना एकत्र आणणाऱ्या दिलीप ठाकुरजींचे खूप खूप आभार.. सर्व भावांनी आणि सहकाऱ्यांनी मैत्रिणींनी खूप छान पद्धतीने सहकार्य केले.. त्याबद्दल सर्वांचे आभार,. प्रत्येक जणांमध्ये कुठला ना कुठला चांगला गुण घेण्यासारखा मिळाला.. खूप काही शिकायला मिळाले… खूप काही आनंदाचे क्षण भरून जगता आले… हॅलो खरंच आयोजकाचे खूप खूप आभार.. चुकून कोणाचे मन जर दुखले असेल तर इथे सर्वांनी माफ करावं …आणि कायम एकमेकांच्या स्मरणात राहावं.. नांदेड मध्ये अशाच आपल्या गाठीभेटी होत राहतील…
*डॉ.स्नेहाराणी व डॉ.महेश बिराजदार*
यात्रेतील सर्व ज्येष्ठ मंडळी पाहून उगीच यात्रेला आलो असे वाटले. पण पहिल्या दिवसापासून दिलीपभाऊ यांनी असे काही हसवत ठेवले की, कॉलेजच्या ग्रुप पेक्षा सुद्धा जास्त आनंद या टूर मध्ये आला. विविध खेळ, अंताक्षरी,विनोदी किस्से या मध्ये १३ दिवस बघता बघता संपले. आमच्या लग्नाचा वाढदिवस भाऊंनी प्रत्यक्ष दुसऱ्यांदा लग्न लावूनच साजरा केला हे आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. तरुणांनी बिनधास्तपणे भाऊ सोबत टुर करावी असा आमचा सर्वांना सल्ला आहे.
*आनंद साताळे बाराळी*
बम बम बोले बम बम बोले
सर्व अमरनाथ यात्रेकरूंचे मनापासून आभार,
विशेषतः दिलीप भाऊंचे मनापासून धन्यवाद. आमचे अगोदर नियोजन नसताना आमची अचानक अमरनाथ यात्रा घडवून आणले त्याबद्दल.तसेच इतरही अनोळखी 90 सदस्य असून सुद्धा आपण एकत्र कुटुंबासारखे राहून
आपण तेरा दिवसाचा प्रवास सुखरूप पार केला. मनसोक्त व मजेत प्रवास केला हे विशेष. हा प्रवास आपण दिलीप भाऊंच्या सोबत राहून खूप आनंदी प्रवास करायला भेटला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आपले प्रेम आमच्या सोबत असेच राहो.
*बालाजी इंगोले मुखेड*
सर्व अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविक यात्रेकरूंचे मनःपूर्वक अभिनंदन व यशस्वी यात्रा आनंदी वातावरणात पार पडल्याबद्दल भगवंताचे व आपले यात्रेचे सारथी एडवोकेट दिलीपभाऊ ठाकूर यांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार व स्वागत
भाऊंनी माझ्यावर डायमंड ग्रुपच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली होती ती पार पाडत असताना माझ्या हातून कळत नकळत काही अनावधानाने चूक झाली असल्यास आपल्याच मोठ्या भावाप्रमाणे मला क्षमा करावी व आपलं सदैव प्रेम माझ्या पाठीशी ठेवावं हीच सर्व भाविक भक्तांच्या चरणी प्रार्थना
*योगेश पटेल*
बम बम भोले जय माता दी,आपण सर्वांचे अगदी मना भावातून आभार आभार आभार व मनःपूर्वक अभिनंदन व यशस्वी यात्रा आनंदी वातावरणात पार पडल्याबद्दल भगवंताचे व आपण सर्वांच साथ सहयोगामुळे 13 दिवस कसे गेले कळलेच नाही. माफक दरात आलिशान टूर घडवून आणल्याबद्दल व यात्रेदरम्यान खाण्यासाठी एकही पैसा न घेता भरपूर खाऊ घालनारे आपले यात्रेचे सारथी एडवोकेट दिलीपभाऊ ठाकूर यांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार.
* सौ.मृदुला व बलभीम पत्की*
ना भूतो ….!ना भविष्यती……!
असा अमरनाथ आणि माता वैष्णवी देवी दर्शन टूर…
आमच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असलेलीअमरनाथ यात्रा आहे. दिलीपभाऊंच्या कल्पकतेमुळे यात्रेतील सर्वजण मनमिळाऊ जीवाला जीव लावणारी आपली माणसं झाली.
मी आजारी असताना माझी सर्वांनी न चुकता विचारणा केली.त्यामुळे माझा अर्ध्याच्या वर आजार कमी झाला आणि मला पुढील यात्रा सुखमय झाली..
सर्वांचे मनापासुन आभार.
*सचिन उल्लेवाड*
एकदम सुंदर नियोजन, प्रशस्त हॉटेल व हाऊसबोट मध्ये राहण्याची सुंदर व्यवस्था, आरामदायी एसी बसेस, दिलीप भाऊंची प्रसंगांनुरुप विनोद सांगण्याची अफलातून हजरजबाबी शैली, खाण्यासाठी एकही पैसा लागू न देण्यामागे भाऊंचा दांडगा जनसंपर्क, आदरयुक्त दरारा यामुळे कधी न विसरू शकणारी अमरनाथ यात्रा यशस्वी केल्याबद्दल दिलीप भाऊंचे मनापासून धन्यवाद आणि
सर्व अमरनाथ यात्रेकरूंचे मनापासून आभार.
*सौ. सुमति प्रा.शशिकांत कुलकर्णी*
खडतर यात्रा, माझ्या सारख्या वृध्द जोडप्याला सुखरूप पणे करून आणले त्या बद्दल दिलीपभाऊ ठाकूर व सहकार्यांचे मन:पुर्वक आभार व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा…
धन्यवाद,
*सौ. सुजाता आंबेकर व सुधीर आंबेकर*
आता पर्यंत आम्ही कधीच ग्रुप मध्ये व एवढ्या 13 दिवसाची यात्रा केली नाही.
अमरनाथ आणि माता वैष्णवी देवी दर्शन…. टूर…
आमच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण.
यात्रेतील सर्वजण मनमिळाऊ होते,यात्रा सुखमय झाली..
सर्वांचे मनापासुन आभार…आम्हाला काश्मीर पहाव असं खूप वर्षा पासून वाटत होतं ती अमरनाथ यात्रे ने पूर्ण झाली.
यालाच म्हणतात दुग्ध शर्करा योग.
वेळेवर नाष्टा, चहा, दुपारचे जेवण, रात्री चे जेवन जसे काही आपण घरीच आहोत असे वाटत होते.
हे सर्व श्री दिलीप जी ठाकूर मुळेच झाले.
*डॉ. नखाते व सौ. वैशाली नखाते, नांदेड*
यात्रेतील १३ दिवस कसे गेले ते कळले नाही.सर्वानी आम्हाला उत्तम सहकार्य केले,विशेषतः अक्षय हुरणे, शयामभाऊ हुरणे,योगेश पटेल यांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत सहकार्य केले हे आम्ही कधीच विसरणार नाहीत. दिलीपभाऊंचे विशेष आभार व धन्यवाद. कारण त्यांचे मुळे ही यात्रा सफल झाली. त्यांचे उत्तम नियोजन,
उत्तम संघटन कौशल्य, सर्व ठिकाणी उत्तम व्यवस्था करताना प्रत्येकाची काळजी घेणे. या मुळे यात्रा येशस्वी झाली.
*प्रा. श्रीकांत मुखेडकर*
या प्रवासात दिलीपभाऊ ठाकूर यांच्याकडून अनेक गोष्टी मला शिकायला भेटले …MANAGEMET GURU हा शब्द भाऊ साठी योग्य आहे , संपूर्ण प्रवास मध्ये संयम कसा असावा हे भाऊ कडून शिकलो आहे .भाऊच्या मार्गदर्शनाखाली तेरा दिवसाचा प्रवास काल रात्री पूर्ण झाला.
या प्रवास मधे माझा वर सर्वांनी मला खुप प्रेम दिलं आहे ते मी कधी कधी च विसरू शकणार नाहीं ..
या नंतर पण आपण सर्व जन ठरवून पुन्हा ट्रीप तयार करुन कुठ तरी भाउ सोबत अजुन फिरायला जाऊ.
सर्वांनी आपण संपर्कात राहू या मुळे कायम आपलं एक नवीन नात निर्माण झालं ते कायम पुढे चालु राहील.
*सौ.ज्योती व रामेश्वर वाघमारे*
आपण सर्वजण श्री महादेव कृपेने १३ दिवस एकञ होतो. सोबत होते धर्मभूषण ॲड. दिलीपजी ठाकुर हे कुशल संघटक, शांत, संयमी व्यक्तीमत्व, कोणत्याही परीस्थीतीला समोर जाण्याची धमक. आणि तेवढाच अत्मविश्वास. यात्रेचे दिवस कसे गेले समजलेच नाही.आपण सर्वजण अनओळखी तरीपण..खुप जवळचे संबध.जसे आपण एकमेकांचे वर्षानुवर्ष मित्र.कोणाचाही चेहर्यावर जरा काही फरक दिसला की सगळेच विचारणार काय झाल.नाष्टा केला का, जेवण झाल का.गोळी देवु का.औषध देवु का.किती काळजी किती तो आपलेपणा.हा अनुभव वेगळा होता.जो ईश्वर कृपेने आपण सर्वाना अनुभवता आला.कुठेही वाद नाही.तक्रार नाही.भांडण तर नाहीच. जसे काही आपण एकमेकाची काळजी करण्यासाठीच एकञ आलो.या सर्वच याञेकरुचे सहकार्य, प्रेम लाभले. संपर्क ठेवावा…पुढच्यावेळी कुठे भेट झाली तर दोन शब्द व्हावेत.आणी परत आपली याञेदरम्यान बम बम भोलेने भेट घडवुन आणावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
*प्रा. प्रकाश शिंदे, पुणे*
महादेव, वैष्णोदेवीच्या कृपेने 13 दिवसांच्या यात्रेत आपणा सर्वांचा अतुलनीय सहवास, आपण सर्वांचे मनापासून सहकार्य तसेच दिलीपभाऊ यांचे कुशल ,अनुभवी नेतृत्व मिळाल्याने यात्रा सुखद संपन्न झाली. यात्रेतील या कुटुंबातील सर्व अपरिचित असुनही घरच्या कुटुंबापेक्षा जास्त काळजी घेणारे, समजूतदार , संयमी यात्री असल्याने यात्रा कधी संपली ते घरी आल्यावरच कळले.
सहलीत नेहमीच साथ देणारे, वडीलबंधुचा हक्क असणारे
सौ.अलकाताई व अमर शिखरे पाटील व आपण सर्वांचे मनापासून आभार.
पुन्हा एकदा नविन सहलीत/यात्रेत भेटुत ही ईश्वरचरणी प्रार्थना.
*प्रदीप दांडेगावकर वसमत*
This remarkable trip is due to all members support And kind co operation… Thnx to all of u…. Special TQ to Dilipbhau
(अमरनाथच्या गुहेतून या लेखमालेतील पुढच्या भागात वाचकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात येणार आहे .त्यामुळे ” अमरनाथच्या गुहेतून ” ही लेखमाला आपल्याला कशी वाटली याबाबत ९४२१८ ३९३३३ या क्रमांकावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून पाठवाव्यात.)
*(क्रमशः)*