मन्याड खोर्‍यातील संघर्ष योध्दा डाॅ. भाई केशवराव धोंडगे

 

सध्या प्रत्येक राजकीय पक्षातील नेते केंव्हा पक्ष बदलतील आणि कोण केंव्हा कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करेल हे आज घडीला सांगने अवघड झाले आहे. सध्या राजकीय पक्षातील नेते संधीसाधु झाले असुन त्यांच्यात पक्ष निष्ठा शिल्लक राहिलेली दिसत नाही. या बिळातुन त्या बिळात जसे उंद्र जातात त्याप्रमाणे नेते या राजकीय पक्षातुन दुसर्‍या राजकीय पक्षात स्वार्थासाठी प्रवेश करीत आहेत. अशी परीस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली दिसत आहे. पक्षनिष्ठा कशी असते हे जर शिकायचे असेल तर माजी खा. व माजी आ. डाॅ. भाई केशवराव धोंडगे साहेबाकडून शिकली पाहिजे. कारण सत्ता असो किंवा नसो सतत विरोधी पक्षात राहुन त्यांनी जनसामान्याची सेवा केली आहे. वयाच्या एकशे दोन वर्षापर्यंत या मतदार संघातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला आहे. कधी त्यांनी मंञीपदाची अपेक्षा केली नाही.कधी त्यांना मंञीपदाचा मोह जडला नाही. त्यांना जर राज्याच्या व देशाच्या राजकारणात मंञीपदाचा मोह असता तर ते तेंव्हाच मंञी झाले असते. या मतदार संघातील जनतेला त्यांनी स्वाभिमान शिकविला आहे. पण कधी त्यांनी मंञी पदासाठी कोणापुढे मान झुकवली नाही. अशा स्वाभिमानी मन्याड खोर्‍यातील संघर्ष योध्दा डाॅ. भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी मानाची जय क्रांती.
मन्याड खोर्‍यातील संघर्ष योध्दा माजी खा. व माजी आ. डाॅ. भाई केशवराव धोंडगे यांचा जन्म १४ जुलै १९२२ रोजी बहाद्दरपुरा येथे झाला. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा हे त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. त्यांनी आपल्या स्वकृृृत्वाने आणि मेहनतीने जवळपास २५ ते ३० वर्ष या कंधार लोहा मतदार संघाचे नेतृृृत्व केले आहे. माजी खासदार व माजी आमदार डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी १९५७, १९६२, १९६७, १९७२, १९८५, आणि १९९० अशा तब्बल सहा वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि सहाही वेळा विधानसभा निवडणूका जिंकल्या आहेत. १९७५ च्या आणीबाणीच्या नंतर १९ ७७ मध्ये त्यांनी नांदेड लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकुन त्यांनी दिल्ली मध्ये आपल्या तडफतार वकृृृृत्वाने संसदेत त्यांंनी छाप पाडली आणि नांदेड जिल्ह्याचे व कंधारचे नाव देशपातळीवर उज्वल केले आहे. १९९५ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी कधी जनसेवेच्या कार्यात खंड पडू दिला नाही.सतत त्यांनी जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत राहिले.
आयुष्यभर त्यांनी या मतदार संघातील गोरगरीब जनतेची प्रामाणिकपणे सेवा करुन न्याय मिळवून देण्याचं काम केले आहे. सतत विरोधी पक्षात राहून कंधार लोहा मतदार संघातील जनतेचा आवाज बुलंद करण्याकरता त्यांनी अहोराञ प्रयत्न केले आहेत. त्यांनी त्यांच्या ३० वर्षाच्या कारर्कीदीत सत्याग्रह, मोर्चा काढून त्यांनी भल्याभल्यांची झोप उडवली आणि अधिकार्‍याना घाम फोडला आहे. सामान्य जनतेचे प्रश्न सुटल्याशिवाय ते स्वस्त बसत नसे मतदार संघातील अनेक प्रश्नाला वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे. मतदार संघातील प्रत्येक नागरीक त्यांना कधी परका वाटला नाही. मग ते कोणीही असो तो आपला आहे. माझ्या कुटुंबातला आहे. असे समजुन त्यांनी जनतेची कामे करीत होते. जिथे अन्याय, तिथे केशवराव धोंडगे हे समिकरणच होतं अन्यायाविरोधात बंड पुकारणारा नेता म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रभर होती. डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांची ओळख पांढराशुभ्र नेहरु शर्ट आणि पांढर धोतर घालुन कपाळी मातीचा टिळा लावून मुक्ताईचे दर्शन घेवून आपल्या दिनचार्याला सुरवात करीत असे. ज्या दिवशी माझ्यातला स्वाभिमान मरुन जाईल त्या दिवशी मी महातारा झालो अशी त्यांची भावना होती. आजही वयाचे १०२ वर्ष झाले तरी तरून आहे कारण माझी माय मुक्ताईचे माझ्याव अनंत कोटी उपकार आहेत. आजच्या मिडीया विषयी बोलताना ते म्हणायचे मी तुमच्या प्रसिध्दीवर ,मेहरबाणीवर मोठा झालो नाही. तर माझी कंधार लोहा मतदार संघाची मायबाप जनता आणि आमची जयक्रांती समर्थ आहे. आमची वाणी समर्थ आहे असे रोखठोक बोलणारे रोखठोक भुमिका मांडणारे भाई केशवराव धोंडगे होते. या देशाचा पंतप्रधान महाराष्ट्राचा झाला पाहिजे ही भुमिका डाॅ. भाई केशवराव धोंडगे यांची होती. भाई केशवराव धोंडगे हे शेतकरी कामकार पक्षाचे आमदार असले तरी. त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान करा किंवा राष्ट्रपती करा शरद पवार भारताचा कोहीनुर हिरा आहे. असे प्रखड मत भाई केशवराव धोंडगे यानी एका भाषणात बोलुन दाखवले. महाराष्ट्राच्या जडनघडनी मध्ये आणि विशेत: सभागृृृहाच्या कामकाजामध्ये त्यांनी उतुंग असे काम केले आहे. जाती पातीच्या जोखडातुन, अंध्दश्रध्देतुन भोळा भाबडा गोरगरीब समाज मुक्त झाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले आहे. त्यांच्यात माणुस ओळखण्याची कला होती एखाद्याच्या चेहर्‍यावरुन त्यांची समस्य काय आहे हे ते चटकन ओळखत असे भटक्या आणि विमुक्त समाजासाठी त्याच्या आत्मसन्मानासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे.कंधार शहरातील वैदु समाजासाठी शहराच्या मुख्य रस्त्यावर स्वतंञ वसाहात निर्मान केली आणि त्यांना हक्काचे घरे बांधून दिली ,पालवाले, कुणबीराजा, गुराखीराजा शेतकरी राजा आणि नाहीरेवाल्यांचा तो बुलंद आवाज होता. गोरगरीबांच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी सतत संघर्ष केला आहे.म्हणून एका वैदु समाजाच्या नागरीकानी त्यांनी मुख्यरस्त्यावर बांधलेल्या टोलेजं ईमारतीला आमचे आधारस्तंभ भाई केशवराव धोंडगे असे नाव देवून उपकाराची परतफेड करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. समता,स्वातंञ्य, बंधूता यावर त्यांची नितांत निष्ठा होती. ग्रामिण व डोंगराळ भागातील गोरगरीबांचा मुलगा, मुलगी कोणीही शिक्षणापासुन वंचित राहू नये सहज त्याला घरची भाकर खावुन शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९४९ रोजी केली. आज या शिक्षण संस्थेचे जाळे मराठवाडाभर पसरलेले आहे. जवळपास त्यांच्या एकुण शाखा ४२ आहेत त्यामुळे आज कंधार व लोहा तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील मुलं,मुलीं मोठ्या दिमाखाने घरची भाकर खाऊन शिक्षण घेत आहेत. या मतदार संघात कांही शिक्षण संस्था अशा आहेत की ते पैसे कमवण्यासाठी पैसे घेतल्या शिवाय सामान्य गोरगरीब मुलांना प्रवेश दिला जात नाही. पण डाॅ.भाई केशवराव धोंडगे यानी शिक्षण संस्था स्थापन करुन सामान्य गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण दिले त्यांच्या शिक्षण संस्थेच नावच आहे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी आज सामान्य गोरगरीब समाजाची मुले ,मुली श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेवुन राज्यात व परराज्यात शासनाच्या उच्च पदावर काम करीत आहेत त्याचे सर्वश्रेय डाॅ. भाई केशवराव धोंडगे याना जाते. त्यांनी आयुष्यभर जनसामान्याची सेवा करीत असतांना त्यांनी कधी जातीवाद केला नाही. वैदु, कैकाडी, फाशीपारधी, वडार समाजाच्या मुलांना बोलावुन घेवून त्यांच्या शिक्षण संस्थेत नौकरी मिवळून दिली. या शिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍याची संख्या असताना कर्मचार्‍याचा अपमान होयील असे कधी बोलले नाहीत. डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या पावलावर पाउल टाकुण काम करण्याचा प्रा. डाॅ .पुरुषोत्तम धोंडगे प्रयत्न करीत आहेत पण त्यांना सार्वजनिक जिवनात वावरत असताना गोरगरीबांची सेवा करीत असताना त्यांना खुप मोठा बदल करुन घेवयाचा आहे. आणि तो त्यांनी केला पाहिजे तरच मालकाच्या पाउलावर पाऊल टाकून काम करीत असल्याचे सार्थक होईल. डाॅ. भाई केशवराव धोंडगे यानी १९९२ रोजी जागतीक गुराखी साहित्य समेलनाची निर्मीती करुन या गुराखी साहित्यातुन शेतकर्‍याचे प्रश्न नंदीवाल्याचे प्रश्न ,गारोड्याचे प्रश्न मेढपाळ राज्याचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला आहे. त्यांची आठवण आजही या मतदार संघातील जनतेला आल्याशिवाय राहणार नाही.

पञकार प्रल्हाद दे. आगबोटे कंधार
ता. कंधार जि. नांदेड
मो. ९५६१९६३९३९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *