भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी केदार जगदगुरु यांचा शनिवारपासून गुरुपोर्णिमा सोहळा

 

नांदेड; उत्तराखंडमधील ओखीमठ येथील श्री श्री श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा ५२ वा गुरुपोर्णिमा सोहळा नवीन नांदेड, गोपाळचावडीमधील भीमाशंकरनगर येथील श्री गुरु दशमुख आश्रम येथे दि. 20 व 21 जुलै असे दोन दिवस होणार आहेत. यामध्ये संगीतयुक्त इष्टलिंग महापूजा, धर्मसभा आणि महाप्रसाद होणार आहे.

शहरालगत असलेल्या गोपाळचावडीमधील भीमाशंकरनगर येथील श्री गुरु दशमुख आश्रम येथे शनिवार, दि. 20 जुलै रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत होमहवन व दीक्षा कार्यक्रम होणार आहे. रविवारी, दि. 21 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत संगीतयुक्त इष्टलिंगपूजा, दुपारी बारा वाजता श्री संगमेश्‍वर गुरुकुलचे उद्घाटन, त्यानंतर धर्मसभा आणि देशातील गणमान्य मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे. तर दुपारी दोन ते सहा या वेळेत महाप्रसाद व दर्शन हे कार्यक्रम होणार असल्याची माहीती श्री गुरु दशमुख आश्रम सद्भक्त मंडळी आणि भीमाशंकर गृहनिर्माण संस्था यांनी एका पत्रकात दिली आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *