मन्याड व गोदावरी खोऱ्यातील राष्ट्रभक्तीचा स्फूर्तिदायी उपक्रमाची मानव्य विकास विद्यालयातून सुरुवात.

 

 

देगलूर ; प्रतिनिधी  

भारत हा देश जय जवान! जय किसान,जय विज्ञानावर अधारीत असून देशाच्या जडणघडणीत तिघेही महत्त्वाचे असून त्यात देशाचे रक्षण करणारा सीमेवर तैनात जवान देशासाठी सुरक्षाकवच मानला जातो.म्हणतात ना
ऐ मातृभूमी तेरे।चरणों पे सिर नमाऊं।
मैं भक्ती भेट अपनी। तेरे शरण में लाऊं ॥
माथे पे तू हैं चंदन। छाती पे तू हैं माला ॥
जिव्हा पे गीत तेरा। मैं तेरा नाम गाऊं॥
हे काव्य जेंव्हा म्हणटल्याते तेव्हा आपल्या सर्वांच्या रोमा-रोमात वीर रस संचारुन आपल्या सैनिकांच्या शौर्याचे गोडवे अखिल भारत खंडात दुमदुमले जाते.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या परिवार गुरफटून जगतो आहे.पण रक्षाबंधन सणाच्य
निमित्त बहिन आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जाते.प्रत्येक कुटूंबात हा सण-उत्सव घराघरात साजरा होतो.पण भारतीय वीर सैनिक आपल्या कुटूंबा पासून कोसो दुर राहून भारत मातेची सेवा डोळ्यात तेल घालून करतो. कुटूंबातील भगीनींची राखी बांधुन घेण्यापासून वंचित राहतो म्हणून कंधार येथील सुंदर अक्षर कार्यशाळेंनी मन्याड व गोदावरी खोऱ्यातील शालेय भगीनींचे ३३३३ सदिच्छापत्रे व ३३३३ राख्या अन् सोबत १५ फुटी महाराखी गेली १० दहा वर्षापासून अखंडित देशभक्तीचा उपक्रम मन्याड व गोदावरी खोऱ्यातील शालेय भगींनीच्या समर्थ हस्ते पत्र लिहून भारतीय सैनिकांना सीमेवर पाठविण्यात येते.यंदा मानव्य विकास विद्यालय देगलूर या ज्ञानालयात सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचा स्फूर्तिदायक उपक्रमास न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला.

 

या कार्यक्रमात देगलूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मा. विश्वनाथराव झुंजारे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.शाळेचे मुख्याध्यापक व पोलीस निरीक्षक झुंजारे साहेब यांच्या समर्थ हस्ते सदिच्छापत्राचे विमोचन केले.ज्ञानालयाच्या वतीने उपस्थितांचा यथोचित सन्मान केला.
या कार्यक्रमात मन्याड व गोदावरी खोऱ्यातील स्फूर्तिदायक उपक्रमाचे मार्गदर्शक, पत्रकार व श्री शिवाजी काॅलेज शिवाजीनगर कंधारचे माजी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. गंगाधर तोगरे यांनी देशभक्तीच्या उपक्रमाची ओळख सांगत यंदा मानव्य विकास विद्यालय देगलूर या शाळेची निवड गुणवत्तापूर्ण सातत्य असल्यामुळेच निवड केली आहे.राष्ट्रकूट कालीन कंधारचा उपक्रम चालुक्यकालीन देगलूर नगरी राबवून ऐतिहासिक उपक्रम बनला आहे.आपल्या गावात घरीच राहून देशभक्ती कशी जपल्या जाते,याचे उत्तम उदाहरण सुंदर अक्षर कार्यशाळेचे सुलेखनकार दत्तात्रय एमेकर गुरुजी,ग्रंथपाल-श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार यांच्या या स्फूर्तिदायक उपक्रमातुन दिसते.या प्रसंगी पत्रकार राजेश्वर कांबळे सर यांची उपस्थिती ठळक होती.

या कार्यक्रमास मानव्य विकास विद्यालय देगलूरचे आदर्श शिक्षक व पत्रकार शिवानंद स्वामी सर यांनी व त्यांच्या सहकार्यानी सकाळी प्रार्थनेत कार्यक्रम घेण्याची मान्यता देवून मन्याड व गोदावरी खोऱ्यातील देशभक्तीच्या स्फूर्तिदायक उपक्रमात ३०० शालेय विद्यार्थ्यांनीनी सहभाग होण्याचा मनोदय व्यक्त केला.या कार्यक्रमात डाॅ.गंगाधरराव तोगरे सरांनी शाळेचा गुणगौरव करतांना मानव्य विकास विद्यालय देगलूरची निवड केली.जिल्हाधिकारी नांदेड येथे कार्यक्रम करुन भारतीय डाक विभागामार्फत सीमेकडे रवाना रक्षाबंधन सणाचे सदिच्छापत्र व राख्या आणि १५ फुटाची महाराखी रवाना होईल.देगलूर पोलिस ठाण्याचे सुनिल पत्रे यांचे सहकार्य आणि योगदान उल्लेखनीय होते.या कार्यक्रमाची क्षणचित्र मिडीया छायाचित्र किरण मुधोळकर यांनी केले.सुत्रसंचलन शिवानंद स्वामी सर यांनी उत्कृष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *