आव्हानांनाच आव्हान देत गोदा- मन्याड खोऱ्यात लोकसेवा करणाऱ्या – सौ.आशाताई शिंदे

 

धैर्य आणि शौर्याची वाहिनी
समाज मनाची मोहिनी
राहो अखंड यशस्वी जीवनी
शुभकामना या जन्मदिनी

 

“शेकापचे अध्यक्ष भाई जयंत पाटील यांनी आशाताई शिंदे यांच्या धडाकेबाज सामाजिक कार्याची अल्पावधीत दखल घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून त्यांची नेमणूक केली आणि आशाताईंना महाराष्ट्राच्या समाजकारणाची व राजकारणाची जबाबदारी देताना त्यांच्या समाजोपयोगी कामाची जणू पावतीच दिली आहे. “

खरे तर लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघ म्हणजे नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ, अवर्षणग्रस्त मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, स्वातंत्र्यानंतर या मतदारसंघात प्रथमच महिला सामाजिक कार्यकर्त्या म्हणून या मतदारसंघाला लाभलेल्या गोदा- मन्याड खोऱ्याच्या कर्तबगार “आयर्न लेडी” व लोहा कंधार मतदारसंघाचे भूषण म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या, ममता सागर सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. लोहा कंधार मतदारसंघातून नांदेड जिल्ह्यात अल्पावधीतच आपल्या सर्वसमावेशक लोकाभिमुख सामाजिक कार्याच्या जोरावर समाजकारण व राजकारणात त्यांनी आपले कर्तत्व सिद्ध केले आहे. आशाताईचे वडील शांतिदूत कै. गोविंदराव पाटील चिखलीकर म्हणजे याच भागात सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे नाव ,लहानपणापासूनच आशाताई यांना समाज कार्याची आवड होती ,

आशाताई विवाह बंधनात अडकल्यानंतर देखील पती माजी सनदी अधिकारी तथा लोहा कंधार मतदारसंघात विकासाची गंगा आणणारे लोकनेते ,विकास पुरुष म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेले कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या खांद्याला खांदा देऊन एक आदर्श पत्नी म्हणून आशाताईंनी सामाजिक कार्यांसाठी सदैव स्वतः ला अक्षरशः वाहून घेतले आहे. आ. शिंदे साहेब सनदी अधिकारी पदावर असतानाही दीन ,दलित, शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना न्याय देण्यासाठी व गोरगरिबांची सेवा करण्याची आशाताईंना मोठी संधी मिळाली.

 

आमदार शिंदे साहेब व आशाताई शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक आणि इतर आवश्यक ती मदत केली आहे. अनेक लोकांच्या शिक्षण आणि आरोग्याच्या समस्या निरपेक्ष भावनेने सोडवल्या आहेत, अनेकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, गोरगरिबांच्या मुला-मुलींचे लग्नासाठी मदत असो की त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य असो अशा माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक कार्य करून केवळ मतदार संघातील लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला आहे हे या मतदारसंघाचे मोठे भाग्य आहे की,

 

सन 2019 ची विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे या उच्चविद्याविभूषित आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला विधानसभेच्या निवडणुकीत सुजाण मतदारांनी लाखोंच्या मताधिक्याने विजयी केल्यानंतर आशाताईंनी या संधीचं सोनं करीत अल्पावधीतच त्यांनी एखाद्या पुरुषालाही लाजवेल, अशा पध्दतीने रात्रंदिवस कठोर परिश्रम घेत मतदारसंघातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार, शेतमजूर, बचत गट, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य , दळणवळण, सिंचन, वीज, पाणी अशा नानाविध मूलभूत कामासह मतदारसंघातील अत्यावश्यक मूलभूत विकास कामांना गती देण्यासाठी व प्रलंबित विकासकामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी व गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आशाताई मतदारसंघात सदैव भिंगरी सारख्या फिरत असतात.

 

मतदारसंघातील शेवटच्या वाडी, तांड्यावर प्रत्यक्ष भेटीगाठी देऊन लोकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात, पती माजी सनदी अधिकारी असताना व लोहा कंधार मतदासंघाचे विद्यमान आमदार असताना देखील फक्त सामाजिक सेवाभावी वृत्तीने आशाताई सामाजिक काम प्रामाणिक करतात , आशाताईंना सामाजिक कार्याची आवड नसती तर मुंबईहून आपले लक्झरी जीवन सोडून आशाताई लोहा कंधार मतदार संघात आल्याच नसत्या. पण त्यांच्या वडिलांपासूनचा सामाजिक कार्याचा आदर्श घेऊन पती आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रामाणिक सामाजिक कार्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार राहिल्या हे विशेष.. आशाताईंनी गोरगरिबांची प्रामाणिक निस्वार्थी सेवा करून सर्वसामान्यांना न्याय देण्यात अत्यंत समाधान वाटत असते. कारण आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या सर्व कुटुंबाने सर्वसामान्य गोरगरिबांच्या अडचणी दूर करण्यासाठी विविध कामांच्या माध्यमातून लोकांना सर्वतोपरी मदत करणारे घराणे म्हणून आमदार शिंदे साहेब व आशाताई व सर्व शिंदे कुटुंबीयांची नांदेड जिल्ह्यात चांगली ओळख आहे, देव हा गोरगरीब, शोषित, पिडित ,वंचित, शेत मजुरांच्या डोळ्यात असतो असे आमदार शिंदे साहेब नेहमी म्हणत असतात त्याप्रमाणे आशाताई यांची सर्वसामान्या प्रति धडाकेबाज कार्यशैली व कुटुंबवत्सल, मायाळू, प्रेमळ स्वभाव असणाऱ्या ममता सागर आशाताई बद्दल लिहायचं झालं तर खूप काही लिहिता येते,

 

सर्वसामान्य जनतेचा विकास व्हावा, मतदारसंघ सुजलाम.. सुफलाम व्हावा, तसेच दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळायला पाहिजेत, असा ध्यास घेवुन त्यासाठी त्या सदैव अग्रेसर राहतात, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प मनाशी घट्ट धरून आशाताई यांचा दैनंदिन दिनक्रम निश्चित करीत असतात. आमदार शामसुंदर शिंदे साहेबांना व आशाताई शिंदे यांना सामाजिक कार्य करते वेळेस कोरोनाचा महाभयंकर संकटात दोन वेळा कोरोनाची बाधा झाली होती तरीही आशाताई आणि आमदार शिंदे कुटुंबीयांनी न डगमगता कोरोनाच्या महाभयंकर काळात मतदारसंघातील लाखो जनतेच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी सदैव स्वतः पुढाकार घेतला आहे हे विसरता येणार नाही,कोरोना काळात हजारो नागरिकांना कोरोनाच्या संकटात अडकलेल्या मतदारसंघातील व जिल्ह्यातील हजारो नागरिकांना शिंदे साहेबांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करून मोठा आधार दिला आहे. कोरोनाच्या काळात अनेक वैद्यकीय सोयी सुविधा जसे की हजारो गरजूंना इंजेक्शन, गोळ्या व रुग्णांच्या अनेक अडचणी वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोना बाधित रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिंदे कुटुंबीयांनी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत.

 

ग्रामपंचायत निवडणुकीच्यावेळी आशाताई यांनी मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना सूचना करून गावागावात वादविवाद न होण्यासाठी व गावागावात शांतता, बंधुभाव कायम राहण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारसंघातील 16 ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यात त्यांना मोठे यश आले आहे, तसेच त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकि १६ ग्रामपंचायतीला प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी आमदार शिंदे यांनी मिळवून दिला आहे. मतदारसंघात अशा प्रकारे विविध समाजउपयोगी कार्यक्रम, उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, बचत गट शिबीर, महिला सक्षमीकरण रोजगार मिळावा, रुग्णांना फळे वाटप, शालेय साहित्य वाटप, नेतृ रोग शिबिर ,चष्मे वाटप, वृक्षारोपण यासह विविध सामाजिक उपक्रम मतदारसंघात राबवलेले आहेत.

 

महिलांसाठी कृषीवल हळदी – कुंकवाचा कार्यक्रम आशाताईंनी लोहा कंधार शहरात प्रथमच व्यापक स्वरूपात घेतला होता,या भव्यदिव्य कार्यक्रमास अनेक मान्यवर व सिने अभिनेत्री यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. महिलांचा हळदी – कुंकू कार्यक्रम हा लोहा – कंधार शहरात रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा कार्यक्रम ठरला होता, हे विशेष. या मतदारसंघातील अनेक गावात आशाताईंनी विविध गावांचा मूलभूत विकास होण्यासाठी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. दिवस रात्रीचे 24 तासात आशाताई यांनी ग्राउंड लेव्हलला 16 ते 18 तास काम केले असल्याने मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेला आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, दळणवळण रस्ते यासह नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आशाताई सदैव धडपडत असतात. सर्व मतदारसंघातील सर्व सामान्यांची मायमाऊली आणि ममता सागर म्हणून सर्वांना सुपरिचित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांच्या प्रामाणिक , निस्वार्थ आणि धडाकेबाज सामाजिक कार्याची दखल घेऊन शेकापचे अध्यक्ष भाई जयंत पाटील यांनी आशाताई शिंदे यांची शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून नेमणूक करून आशाताईंना महाराष्ट्राच्या समाजकारणाची व राजकारणाची जबाबदारी शेतकरी कामगार पक्षाने देऊन आशाताईंच्या कामाची जणू पावतीच प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करून दिली आहे.

लोहा – कंधार मतदार संघाच्या कर्तबगार, निस्वार्थी प्रामाणिक, समाज कार्य करणाऱ्या, शिव, शाहू ,फुले, आंबेडकरी विचारांच्या वारसदार असणाऱ्या, मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्यांच्या ममता सागर, लोहा – कंधार मतदारसंघाच्या व गोदा मन्याड खोऱ्याच्या भूषण ठरल्या गेलेल्या मतदारसंघाच्या मायमाऊली आयर्न लेडी, शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या, आमच्या मार्गदर्शिका, प्रेरणास्थान आशाताई शामसुंदर शिंदे यांना वाढदिवसानिमित्त निरोगी दीर्घ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी ममता सागर आशाताईंना लोहा कंधार मतदारसंघासह नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निरोगी उदंड दीर्घायुष्य देवो, हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना..

पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.

सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्यासारख्या कर्तबगार महिला या मतदारसंघाच्या सेवेला भेटली
आहे, हे या मतदारसंघाचे भाग्यच म्हणावे लागेल.

ताईसाहेब..’ तुम जियो हजारो साल.. साल के दिन हो पचास हजार ‘ …

 

-* *अशोक सोनकांबळे*
*पत्रकार तथा प्रसिद्धीप्रमुख,* *लोहा तालुका संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य*

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *