येरगी येथील बालिका पंचायत भारतीय जवानांना राख्या पाठवणार!

 

देगलूर: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील ऐतिहासिक चालुक्य कालीन नगरीत,येरगी येथील बालिका पंचायत राज समितीच्या वतीने शाळेतून अन् गावातून भारतीय जवानांना राख्या पाठवणार आहेत.नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक राष्ट्रकूट कालीन कंधार नगरीतील सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार दरवर्षी भारतीय सीमेवरील जवानांना ३३३३ राख्या ३३३३ सदिच्छापत्र सोबत भलीमोठी १५ फुटाची महाराखी पाठवण्यात येते. त्यांचा या उपक्रम राबविण्याचे यंदाचे ११ वे वर्ष असून त्यात येरगी बालिका पंचायत सहभागी होणार आहे.

येरगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन या उपक्रमाची माहिती सुंदर अक्षर कार्यशाळेचे दत्तात्रय एमेकर यांनी प्रास्ताविकेत दिली.श्री शिवाजी काॅलेज शिवाजीनगर कंधारचे माजी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख व पत्रकार प्रा.डाॅ.गंगाधर तोगरे सर यांनी राष्ट्रकूट कालीन व चालूक्य कालिन सांगड घालत सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार यांचा रक्षाबंधन सणानिमित्त राष्ट्रभक्तीचा कार्यक्रमात येरगीची बालीका पंचायत सहभागी होते आहे याचा आम्हास आनंद होत आहे.

यावेळी गावचे कतृव्यदक्ष सरपंच संतोष पाटील,बालिका पंचायत चे पदाधिकारी ,उपक्रमाचे
प्रा.डाॅ. गंगाधर तोगरे यांनी भारतीय जवानांना राख्या पाठवण्या मागचा उद्देश प्रा.गंगाधर तोगरे यांनी आपल्या भाषणातून सांगितला.
यानंतर संतोष पाटील यांनी या उपक्रमासाठी बालिका पंचायत,शाळेतील मुली आणि गावातील महिला या उपक्रमाअंतर्गत सामील होऊन देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना राख्या पाठवतील असे सांगितले.यासोबत गावातील विविध उपक्रमांची माहिती दिली.

याप्रसंगी दत्तात्रय एमेकर यांच्या आई कुसुमबाई यांच्या नावे एक वृक्ष लावण्यात आले.ते जमविण्याचा शब्द दिला.या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करतांना चालुक्य कालीन नगरी येरगी कॉफी टेबल बुक देऊन करण्यात आले. कार्यक्रमात कंधारचे पत्रकार राजेश्वर कांबळे, ढगे सर गावातील प्रतिष्ठित आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन ईश्वर वाडीकर यांनी केले.कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी,गावातील बचत गटातील महिला,बालिका पंचायत चे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *