नांदेड येथिल १०३ यात्रेकरूंचा दुसरा जत्था रविवारी श्रीनगर येथे पोंहचला असून मंगळवारी सर्वजण अमरनाथच्या दर्शनासाठी जाणार

 

 

नांदेड ; ९०भाविकांसोबत २३ वी अमरनाथ यात्रा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुखरूप करून आल्यानंतर १०३ यात्रेकरूंचा दुसरा जत्था रविवारी श्रीनगर येथे पोंहचला असून मंगळवारी सर्वजण अमरनाथच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

पहिल्या जथ्यातील यात्रेकरूंनी १३ दिवसाच्या कालावधीत अमरनाथ सोबत वैष्णोदेवी, अमृतसर, जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग,गुलमर्ग, खीर भवानी माता,अटारी बॉर्डर या स्थळांना भेटी दिल्या. सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,हास्य कवी प्रताप फौजदार,नवनाथ सोनवणे उदगीर,नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, सरदार जागीरसिंघ अमृतसर,सुभाष बंग,केदारमल मालपाणी,अकोल्याचे खत्री परिवार,रेखा भताने,श्याम हुरणे,नारायण गवळी,गोरखनाथ सोनवणे, वंदना सुरेश त्रिमुखे, डॉ.हिवरेकर ,डॉ.नखाते,मधुकर पास्टे, आशुतोष मुखाडे यांनी दरवर्षीप्रमाणे सर्वांना प्रत्येकी एक जेवण दिले.९० यात्रेकरूंच्या एका वेळेसच्या नाश्त्यासाठी योगदान देणाऱ्यामध्ये स्नेहलता जैस्वाल हैद्राबाद ,प्रदीप शुक्ला भोपाळ,सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,डॉ. अजयसिंह ठाकूर पूर्णा,मनोज शर्मा नागपूर,द्वारकादास अग्रवाल, जगन्नाथ सोनवणे,भोपाळचे दिलीप ठाकूर यांचे होणारे व्याही प्रतापसिंह ठाकूर, चंद्रकांत कदम,श्रीपतराव नेवळे पाटील,सुरेखा रहाटीकर, व्यंकट वायगावकर,माधुरी सुवर्णकार,श्रीहरी कुलकर्णी,रामेश्वर वाघमारे,प्रकाश शिंदे,
डॉ. प्रिया त्रिमुखे, गणपतसिंह ठाकूर, ,अमोल गोले,आनंद साताळे, अमर शिखरे पाटील यांचा समावेश आहे.

यात्रा यशस्वी करण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्या समवेत सुभाष देवकत्ते, बालाजी इंगोले, संजय राठोड यांनी परिश्रम घेतले.यात्रेदरम्यान राहण्याची व वाहतुकीची व्यवस्था उत्तम होती.दिलीप ठाकूर यांचे योग्य नियोजन, भोजनाची सर्वत्र मोफत व्यवस्था, विविध मनोरंजक खेळ यामुळे अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ रीतीने पूर्ण झाल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.२३ व्या अमरनाथ यात्रेतील सर्व ९० यात्रेकरूंची प्रकृती उत्तम आहे.२४ व्या अमरनाथ यात्रेच्या वेळी दिलीप ठाकूर, संदीप मैंद, मिलिंद जलतारे, विशाल मुळे, लक्ष्मीकांत जोगदंड यांच्यासह ठाणे येथील उदय यांच्या कॅटरिंग टीम मधील ७ सदस्य चोख व्यवस्था करत आहेत.हवामान उत्तम असल्यामुळे मंगळवारी सर्वांचे दर्शन होईल असा विश्वास दिलीप ठाकूर यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत श्रीनगर येथून बोलतांना व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *