लाडके विद्यार्थी योजना आली तर ??

 

गेली अनेक दिवस आपण लाडकी बहीण योजना किवा लाडका भाऊ योजना अशा बातम्या ऐकत आहोत.. त्यावर उलटसुलट चर्चाही होत आहेत.. खरच याची गरज आहे का ??,, कारण ज्यांना गरज आहे त्यांना ते मिळालं तर ठिक पण जे लहान नोकरी करतात तेही अर्ज भरत आहेत हे कितपत योग्य आहे ??.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामुळे कोणीही काम करणार नाही.. आधीच कामगार मिळत नाहीत अशी बोंब आहे त्यामुळे त्यात आयतं मिळालं तर कोणाला नकोय.. आपण लोकांना लुळं तर करत नाही ना याचा विचार व्हायला हवा.. मी राजकारणावर कधीही लिहीत नाही कारण माझी लेखणी त्या घाणीने बरबटायची पण नाही पण नको त्या गोष्टी समाजात पेरुन काय साध्य करायचं आहे माहीत नाही..

त्यापेक्षां परिस्थितीमुळे किवा शाळा कॉलेजपर्यंत पोचायला सुविधा नसल्याने किवा वह्या पुस्तके नसणे किवा गणवेश असेल.. किवा ट्युशंस असतील.. भाषाशुध्दीसाठी चांगले शिक्षक तयार करणे असेल. संस्कृत शिकणं असेल… शाळेत आपले पोराणिक ग्रंथ अभ्यासाला घेणे असेल.. लैगिकतेबद्दल ज्ञान देणं असेल.. शारीरिक मानसिक आजार असतील.. स्वच्छता असेल.. अशा अनेक गोष्टी गावागावात हव्या आहेत.. या सगळ्याची पूर्तता केली तर असे पैसे वाटायची वेळच येणार नाही .. त्यापेक्षा त्यांना सक्षम बनवा..त्यांच्या हाताला काम कसे मिळेल याचा विचार करा.. आरक्षणासाठी चाललेली धडपड पाहिली की किव येते.. मागासलेपणाचा दाखला मिळवण्यापेक्षा योग्य शिक्षण घेउन पुढारलेपण कसं मिळवता येइल हे पहायला हवं.. त्यासाठी मुलांना , व्यायामाची ,वाचनाची आवड लावून त्यांचे विचार बदलून उत्तम नागरिक तयार करा.. या अशा योजना असतील किवा आरक्षणे असतील यामुळे आपण समाजाला अधोगतीकडे नेत आहोत.. नवीन पिढी या सगळ्यात बर्बाद होत आहे.. या पापात सहभागी होवून आपला खिसा भरुन आता क्षणीक आनंद नक्की मिळेल पण कधीना कधी आपल्याला याची परतफेड करावीच लागणार आहे.

या संदर्भात घडलेला एक किस्सा उदाहरण म्हणुन इथे नमूद करते.. माझा व्हीडीओ पाहून एका २८ वर्षीय मुलाने मला काल फोन केला होता.. तो म्हणाला , मी वयाच्या १३ वर्षापासून हस्तमैथुन करत आहे आणि आता माझे डोळे खोल गेलेआहेत..माझ्या अंगात ताकद नाही.. माझे स्पर्म कमी झालेले असल्याने मला तीन मुली झाल्या आहेत.. स्मर्म कमी झाल्याने मुली झाल्या हा तर अज्ञानाचा कळस आहे.. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच मग तो व्यायाम असेल किवा डाएट असेल पण त्या मुलाच्या शरीरातून सगळं बाहेर जात होतं .. शरीराला प्रोटीन्सची गरज होती ती मिळतच नव्हती.. त्याचं कारण त्याबद्दलचा अभ्यास नसणं किवा त्याची आर्थिक परिस्थिती हे असावं..हस्तमैथुनामुळे मला मुलगा झाला नाही असही ते म्हणाले.. त्यांना मी त्यांचं शिक्षण विचारलं तर ते म्हणाले आठवी झालय त्याचं बोलणं ऐकल्यावर जाणवलं की किती अज्ञान आहे पहा.. या अशा अनेक लोकांना लैगिक शिक्षण असेल किवा इतर ज्ञानाची प्रचंड गरज आहे. खेड्यात लायब्ररीची गरज आहे.. त्यामध्ये फक्त कथा , कादंबऱ्या नकोत तर अभ्यासाची पुस्तके असायला हवीत जेणेकरून यांना बेसिक ज्ञान मिळेल.. खेडोपाडी लोक मोबाईल घेउन बसतात त्या ऐवजी पुस्तके हातात असतील तर त्यांचा सर्वांगीण विकासच होइल.. त्यासाठी त्या गावातील सरपंच किवा प्रतिष्टीत व्यक्तीने पुढाकार घेउन स्वतः अभ्यास करुन यावर चर्चा व्हायला हवी.. जाती , धर्म , आरक्षण यात न अडकता सगळ्यानी एकत्र येउन राजकारण न करता समाजकारण व्हायला हवं.

तरुण मुलांना नम्र विनंती आहे या अशा गोष्टीकडे कानाडोळा करुन डोळे उघडे ठेवून आपले भविष्य ठरवा.. कारण दर ५ वर्षाने वेगळी मंडळी आणि वेगळ्या घोषणा असणार आहेत.. आपलं भविष्य चोराच्या हातात न देता पुस्तके हातात घ्या.. उत्तम वाचा.. व्यायाम करा.. चांगला आहार घ्या.. पिझ्झा बर्गरची दुकानं ही आपली वजने वाढवायलाच आलेली आहेत त्यापेक्षा उत्तम ज्ञानाने आपले समाजातील वजन वाढवा. प्रत्येकाने आपलं नाव घेतलं पाहिजे किवा आपल्याला आयडॉल मानलं पाहिजे इतकं सक्षम स्वतः ला बनवा. कुठलाही राजकारणी आपलं भविष्य घडवु शकत नाही.. त्यांना साधी चार वाक्य बोलता येत नाही ते काय समाज घडवणार ?.. आणि मेहनतीशिवाय या जगात फुकट काहीही मिळत नाही.. जो कष्ट करतो तो उपाशी कधीही रहात नाही.. घाणीत हात घातल्यावर हात बरबटणारच त्यामुळे अध्यात्म असेल .. आपला इतिहास असेल.. आपली समाजव्यवस्था असेल.. गरजूंना मदत करण्याची आपली तयारी असेल .. निसर्गाप्रती प्रेम असेल .. मोठ्यांचा आदर असेल या सगळ्यावर काम करुन कमळासारखं ( फुलासारखं ) राहायला शिका.. जगातला कुठलाही ज्योतिषी आपलं भविष्य रेखाटु शकत नाही पण आपल्या अंगात मेहनतीची रग असेल तर आपलं भविष्य उज्वलच असणार आहे.. खोट्या आमीषाना भुलु नका.

शिवजयंतीला डिजे लावून त्यावर वेडंवाकडं नाचण्यापेक्षा त्यांनी दिलेले विचार आत्मसात करुन ते अंगिकारायची गरज आहे.. शिवाजी महाराज , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , महर्षीकर्वे , स्वातंत्र्यवीर सावरकर , लोकमान्य टिळक् , ज्योतिबा फुले यांनी यासाठीच स्वतःला पणाला लावलं होतं त्यामुळे त्यांच्या विचारांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे.. त्यांचे स्त्रीबद्दल असलेले विचार अंगिकारा.. .. कोणालाही आणि काहीही फॉलो करताना आपण चौफेर विचार करायला हवा ना.. तो न करता आपण चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या व्यक्ती यांना फॉलो करतो.. फक्त डिग्रीने आपण सुशिक्षित होणार नाही आहोत तर चांगल्या विचारानी आपण घडणार आहोत त्यासाठी उत्तम साहित्य , उत्तम माणसं यांना आपल्याला जवळ करायचं आहे.. प्रत्येकाने फक्त आपल्या घरावर लक्ष द्या सुधारणा नक्की होइल..

सोच बदलो… देश बदलेगा..
#SonalSachinGodbole

#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *