अशासकिय प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक यांच्या अर्जित रजा राेखिकरणाबाबत शिक्षक आमदार विक्रम काळे यांना निवेदन

लातूर ; महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मंडळ जिल्हा लातूरच्या वतीने अशासकिय प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक यांच्या अर्जित रजा राेखिकरणाबाबत मा.शिक्षण संचालक (प्रा) यांनी दिनांक 30 मे 2024 राेजी निर्गमित केलेले अन्याय कारक परिपत्रक रद्द करावे यासाठी मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे लाेकप्रिय आमदार विक्रमजी काळे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

पुर्वी प्रमाणेच सेवानिव्रत मुख्याध्यापकांना रजा राेखिकरणाचा लाभ मिळणे आवश्यक आहे तसेच या पुर्वी दिनांक 23 जानेवारी 2013 राेजी महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव यांनी त्या बाबत पत्रहि निर्गमित केले आहे त्या मुळे रजा राेखिकरणाचा लाभ मिळावा असे निवेदन आज देण्यात आले या निवेदनावर गणपतराव बाजुळगे,इस्माईल शेख ,सुरेश लखनगावे ,विनायक शिंदे,हरिदास काेनाळिकर यांच्या सह प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरी आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *