आमचे विश्वनाथराव काँग्रेसचे गल्लीतले कार्यकर्ते….. पोरं मोठी झालेली होती..कामधंदा, शेतीवाडी सांभाळत होती त्यामुळे विश्वनाथरावांना काहीही उदयोग नसल्यामुळे सकाळ संध्याकाळ मारोतीच्या पारावर तळ ठोकून बसलेले… नेमके आम्ही सारी मुलं स्वच्छ गणवेश घालून शाळेला निघालो की ते पारावर बसलेले असणार… आम्हाला ऐकू येईल अशा आवाजात बोलणार, *”बघा महारची पोरं आमचे म्हशी चारायचं सोडून पांढरे फेक कपडे घालून शाळत चाल्यात…. यायला कुळवाच्या खोडावर ठेवून कुऱ्हाडीने कच कच तोडायला फायजे.”*
आमचा गुन्हा काय तर त्यांच्या म्हशी न चारता शाळेत जातो.. ही काँग्रेसच्या गल्लीतल्या कार्यकर्त्याची पोटदुखी….
हे गल्लीत ठीक आहे पण तिकडे दिल्लीत ही मोठे साहेब अशाच मानसिकतेचे….. 1987 ची नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक चालू होती. एक मोठा काँग्रेस नेता म्हणाला, ” बघा आता प्रकाश आंबेडकर ही कारने फिरायला लागलेत… यांच्या कारला पेट्रोल कोण देत आहे तुम्हाला माहीत असेलच……
त्यावेळी bjp तर नव्हती. शेतकरी संघटना होती आता शरद जोशी बाळासाहेब आंबेडकर यांच्या गाडीत पेट्रोल का टाकतील?……..
गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची एकच पोटदुखी… दलितांच्या मुलांनी शाळेत जाऊनये, चांगले कपडे घालुनये. दलितांच्या पुढऱ्यांनी कार मध्ये बसूनये… पायी चालत फिरावं आणि हे मात्र लाखो रुपयाच्या आलिशान गाड्यामध्ये फिरावं ही यांची लोकशाही. ही यांची सामाजिक न्यायाची संकल्पना. 1987ला अशोकराव चव्हाणाच्या प्रचारासाठी मुक्रमाबाद येथे सभा झाली तर मोजून चाळीस गाड्या मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणच्या ताफ्यात होत्या. केंद्रीय नगरी उड्डाण मंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि डझनभर मंत्री उपस्थित होते. नंतर बाळासाहेब आंबेडकर यांची सभा झाली तर एक जीप त्यात बाळासाहेब आंबेडकर आणि माधवराव पाटील शेळगावकर सोबत दोन तीन कार्यकर्ते बस.. तरीही बाळासाहेब आंबेडकरांनी चव्हाण साहेबांच्या तोंडाला फेस आणला होता. तेंव्हा पासून काँग्रेसने बाळासाहेबांची बदनामी सुरु केलेली आहे तर आता पर्यंत चालूच आहे.. त्यासाठी काही पाळीव तितरे पोसलेली आहेत… पारध्याने जाळे टाकले की ही तित्तरे ओरडायला सुरुवात करतात आणि आपल्याच भाऊ बंधाना जाळ्यात अडकवितात… आतातर पारध्याने तित्तरासोबतच काही श्वान ही पोसलेत बिचारे पोटासाठी भुंकतात……पण भुंकन्यालाही काही अर्थ असावा उठ सूट उगीचच भुंकयचे?
यांची पोटदुखी काय तर करोडपती मोरे वंचित कसे?
भावांनो वंचित बहुजन आघाडीत 85% बाहुजन्नाचा समवेश होत असला तरी 15 % उन्नत भारतीयांना त्यांच्या हिश्याचा वाटा द्यायला नको?
बाळासाहेब हे वंचिताच्या भागीदारी साठी लढत आहेत मग ते 85 टक्क्यातील असोत की 15 टक्क्यातील सत्ता वंचित असोत. मोरे आणि अजून कोणी असतील तर ते 15 टक्क्यातील सत्ता वंचित समजा……. वंचितचा उमेदवार करोडपती कसा? करोडोची कार कशी घेतो?हा त्यांचा विकृत मनोवृत्ती दर्शक प्रश्न… अरेरे रे कीव येते तुमच्या नीच मानसिकतेची…. *वामन ओव्हाळ यांची मजल्याच घर* ही कथा आपण वाचली असेल एक महाराचा पोर मजल्याच घर बांधून आमची बरोबरी करतो म्हणून उदघाट्नाच्या दिवशीच त्याचे मजल्याचे घर पेटवून देणारे विकृत मानसिकतेची माणसे 50 वर्षानंतर ही बदलली नाहीत.. स्वकष्टाने पै पै जमा करून एखादा परिवार एखादी मोठी कार घेतली तर तुमचा इतका जळफळाट व्हावा? माझ्या एका मित्राने दोन मजल्याचे घर बांधले तर लगेच लोकांच्या प्रतिक्रिया….., *”कुठं डाका टाकला की.”* एखाद्याने घर बांधले गाडी घेतली तर त्याचे कौतुक नाही … तर जळफळाट… म्हणून *तुकोबाराय म्हणतात निंदाकाचे घर असावे शेजारी*
वंचितचा एखादा उमेदवार करोडपती असणे गुन्हा आहे का?
वंचित चे उमेदवार फक्त करोडपतीच असतील पण तिकडे….?
बलात्कारी
खुनी
गुंड
भ्रष्टाचारी
अगदी बोफोर्स पासून तर आदर्श पर्यंत किती निष्कलंक लोक आहेत?
व्यक्तीद्वेषाची बाधा झालेले मनोरुग्ण बालिशपणाची बडबड करतात त्यांच्या बरगळण्याकडे लक्ष न देता आपण आपल्या ध्येयावर ठाम राहूया. पुन्हा लढूया…
जाऊन सांगा त्या वादळाला
आम्ही पुन्हा आमची झोपडी उभारलेली आहे
गणपत गायकवाड , नांदेड
9527881901
————-++