नांदेड – मुळ शिराढोण येथील मठसंस्थानचे मठाधिपती असलेले श्रीश्रीश्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी केदारपीठ यांचे धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. समाजाला दिशा देण्याचे काम त्यांच्या हातून घडत आहे. संस्कारक्षम पिढी निर्मितीमध्ये त्यांचे काम मोठे असल्याचे प्रतिपादन देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले आहे.
गोपाळचावडी येथील श्री गुरु दशमुख आश्रमामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या इष्टलिंग महापूजा, श्री गुरु संगमेश्वर गुरुकुलचे भूमिपूजन व सेवेकऱ्यांच्या गौरव सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कर्नाटक राज्याचे मंत्री मल्लीकार्जुन शामनूर, खा.प्रभा शामनूर, खा.वसंतराव चव्हाण, खा.सुरेश शेटकार, माजी खा.bha भास्करराव पाटील खतगावकर,माजी मंत्री डी.पी.सावंत, माजी आ.अमिताताई चव्हाण, माजी आ.ईश्वरराव भोसीकर, माजी आ.गंगाधरराव पटने, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, भाजपा नेते गोविंदराव शिंदे नागेलीकर, शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी सभापती किशोर स्वामी, संजय बेळगे, बालाजी पांडागळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबन बारसे, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, उद्योजक एकनाथ मामडे, बाबुराव देशमुख ,राजेंद्र हूरणे,विजय होकर्णे, शिवकुमार देशमुख, दिलीपराव धर्माधिकारी आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना चाकूरकर म्हणाले की, सुसंस्कारीत समाज निर्मितीचे महत्वाचे काम आहे. नव्या पिढीला धार्मिक क्षेत्राची जाणीव करून देतांनाच या पिढीला संस्कारक्षम शिक्षण देण्याकडे सर्वांनी लक्ष पुरविले पाहिजे. श्री केदार जगद्गुरु यांनी धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अविरत काम करण्याचा जो मानस व्यक्त केला आहे त्यातून समाजाला नवी प्रेरणा मिळते.
यावेळी कर्नाटकचे मंत्री मल्लीकार्जुन शामनूर, खा.प्रभा शामनूर यांनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करतांना श्री केदार जगद्गुरु यांनी आपल्या आशीर्वचनातून संस्कारक्षम पिढी निर्मितीमध्ये समाजातील सर्वच घटकांनी सहभाग नोंदविला पाहिजे. असे सांगतांनाच मागील पन्नास वर्षांपासून त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये ज्या व्यक्तीने महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांचा गौरव करण्यात आज आपणास वेगळा आनंद होत आहे असे सांगितले. नव्याने निर्मिण करण्यात येणाऱ्या गुरुकुलमधून योग शिक्षणासह सर्व धार्मिक संस्कारांवर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे यांनी केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरु पौर्णिमा निमित्त श्री केदार जगदगुरु यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेताना युवा नेत्या श्रीजया चव्हाण यावेळी शेजारी माजी आमदार अमिताताई अशोकराव चव्हाण