ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार  डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या जयंती दिनी कंधार येथे  दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्रजी तहकिक यांचा सत्कार

(कंधार ; प्रतिनिधी )

मन्याड खोरे म्हणटले की आठवते,विविध रेकॉर्डब्रेक सत्याग्रह अन् मोर्चे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या चळवळी.लोअर मन्याड धरणाचा विरोधी सत्याग्रह,आणीबाणीविरुद्ध लढतांना महिनोगणती जेल भोगली,प्रतापगडावरील छ. शिवरायांच्या आनावरण प्रसंगी तत्कालीन पंतप्रधान पं.नेहरूंना विरोध करत निषेध अशा हजारों मनावर करणार्‍यां चळवळी करणारे एकमेव कंधारी मातीतले राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, मर्मभेदी आपल्या भाषणातून जनता-जनार्धन यांचेवर गारुड घालणारे व्यक्तीमत्व! आज श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संस्थेचे सहसचिव अँड मुक्तेश्वर केशवरावजी धोंडगे साहेब यांचे अध्यक्षतेखाली,प्रमुख व्याख्याते दैनिक लोकपत्रचे आदरणीय कार्यकारी संपादक मा.रविंद्रजी तहकिक साहेब यांच्या उपस्थितीत आदरणीय तहकिक साहेबांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार डाॅ.भाई मुक्ताईसुत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या मरणोपरांत दि २ जानेवारी २०२३ ते दि.१२ जानेवारी २०२३ या कालखंडात दैनिक लोकपत्र या
नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले एकुण १० लेखांच्या जतन संग्रहाचे विमोचन लेखनी बहाद्दर तहकिक साहेब व अध्यक्ष अँड मुक्तेश्वरराव भाऊ धोंडगे यांच्या समर्थ हस्ते करण्यात आले.या जतन संग्रहाचे चिमुकले शिल्पकार कु.शीतल बसवेश्वर पेठकर वर्ग १० वा अ सेमी,कु.प्रतिक्षा संग्राम मुसळे वर्ग ९ वा अ सेमि आणि कु.अन्वयी भगवानराव जाधव वर्ग ६ वा अ सेमि या तिघी आहेत,मार्गदर्शन गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजींनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात वंदेमातरम गीता होऊन ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना आदरांजली वाहून कार्यक्रम सुरु करण्यात आला. आदरणीय मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर व उपप्राचार्य प्रा.मुरलीधर घोरबांड सर यांनी मोलाचे सहकार्य केले.मातृभक्त मुक्ताईसुत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त मातोश्री मुक्ताई धोंडगे सांस्कृतिक कलामंडपात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड मुक्तेश्वर केशवरावजी धोंडगे साहेब यांनी मातृभक्त केशवरावजी धोंडगे साहेब यांचे विचार आपण आत्मसात करुन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात खरी क्रांति जोपासावी.आपण सर्वांनी माता-पिता भक्तीत जीवन जगावे असे अध्यक्षीय समारोपात विचार मांडले.आपल्या उत्कृष्ट व्याख्यानात आदरणीय रविंद्रजी तहकिक साहेब यांनी माझ्यात अन् केशवरावजी धोंडगे यांच्या चाळीस वर्षाची वर्षाची तफावत आहे.पण त्याचे अन् माझे मैत्रीचे नाते होते.इतक्या कमी वेळात भाई केशवराव कमी शब्दात मांडणे तारेवरची कसरत आहे.पण मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो.डाॅ.भाई साहेबांचे शेकडो किस्से आहेत त्यापैकी का॔ही किस्से सांगत आपले भाषण पूर्ण केले.

 

मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर यांनी प्रास्ताविक केले,तर मान्यवराचा परिचय उपप्राचार्य प्रा.मुरलीधर घोरबांड सर यांनी करुन दिला.गुणवंत विद्यार्थीनी कु.संयोगीता संजयजी भागानगरे हीने १० वी बोर्ड परीक्षेत १०० %मिळवताना कंधार-लोहा दोन तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान पटकविला.कु .संयोगीता भागानगरे हीच्या भारोभार साखर तुला करुन तिचा सन्मान केला.उच्च माध्यमिक विभाग (मराठी)
कु. मेहकरकर धृती पांडूरंग – ८५०५० टक्के प्रथम विज्ञान विभाग उच्च माध्यमिक विभाग मराठी कु. कदम मयुरी केशव -८०.५०% प्रथम वाणिज्य विभाग
उच्च माध्यमिक विभाग कला (मराठी) कु. मैलारे क्रांति विजय-७१.८३% (प्रथम कला विभाग)
कु. कांबळे विशाखा नामदेव ७१.८३% (प्रथम कला विभाग) कुः एकके तेजस्विनी किशन-७१.८३% (प्रथम कला विभाग)माध्यमिक उर्दू विभाग १० वा वर्ग
कु.अन्सारी अलिना मुनिर मोहीयोहीन ९६.४०% प्रथम उच्च माध्यमिक (विभाग विज्ञानउर्दू)
कु. मन्तजा गुलरेज अफसर सरवरी ७०% (विज्ञान उर्दु विभाग) उच्च माध्यमिक विभाग कला उर्दू कु. दानरा बेगम मिर्झा मुकरम बैग ७५% (कला उर्दू विभाग)
कु.राणी महेश कावळे भाग शाळा बहाद्दरपूरा आणि कु.वैष्णवी संतोष चिंतामारे या सर्व गुणवंत विद्यार्थींनींची साखर भारोभार तोलून कार्यक्रम राष्ट्रगीताने सांगता झाली.आभार प्रदर्शन मुख्याध्यापक हरिभाऊ चिवडे सर यांनी केले.

सुत्रसंचलन दत्तात्रय एमेकर यांनी केले.या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर बंधु-भगीनी व ५ वी ते १२ वी चे विद्यार्थी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *