सभापती विक्रांत पाटील शिंदे यांचा कंधार तालुक्यात जनसंवाद दौरा संपन्न

 

कंधार; प्रतिनिधी;

लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा सहचिटणीस विक्रांत पाटील शिंदे यांनी मतदारसंघातील मंगलसांगवी, नंदनवन, औराळ, बारुळ येथे जनसंवाद दौऱ्याचे आयोजन करून या भागातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी जनसंवाद दौऱ्यात सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी नंदनवन,औराळ मंगलसांगवी,बारुळ या भागातील नागरिकांच्या विविध अडीअडचणी संदर्भात कार्यकर्ते पदाधिकारी, ग्रामस्थांशी विविध विषयावर सखोल चर्चा करून या भागातील मूलभूत विकास कामे पूर्ण होण्यासाठी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला असून प्रलंबित विकास कामे पूर्ण होण्यासाठी आमदार शिंदे यांच्या माध्यमातून भरिव निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी जनसंवाद दौऱ्यात ग्रामस्थांना दिली.

 

यावेळी नंदनवन, औराळ, मंगलसांगवी,नंदनवन, बारुळ ग्रामस्थांच्या वतीने सभापती विक्रांत पाटील शिंदे यांचा शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदीप पा. हुंबाड ,रणजीत रणजीत पा. राऊतखेडकर,नारायण सावकार कुंभारे, गंगाधर चिखलीकर, बसवेश्वर मडके, सरपंच सुभाष महाजन ,श्याम पा. पवळे ,ओमराजे शिंदे, सद्दाम कंधारी, विशाल कौशल्य, सचिन जाधव ,राजू भंडारे ,ओम ठाकूर,गणेश इंगळे सह औराळ, नंदनवन , मंगलसांगवी येथील ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *