कंधार ; ( धोंडीबा मुंडे )
माजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२३ ते ३१ जुलै या कालावधीत हे महाआरोग्य शिबीर पार पडणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी लोहा-कंधारच्या वतीने देण्यात आली .
चिखलीकर सर्वसामान्यांच्या सुख दुःखात सहभागी होणारे नेतृत्व आणि गोरगरिबांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
यावर्षी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन लोहा तालुक्यातील किवळा येथे करण्यात येणार आहे. दि.२४ जुलै रोजी कलंबर, दि.२५ जुलै रोजी माळाकोळी,दि.२६ जुलै रोजी सावरगाव, दि.२७ जुलै रोजी कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा दि.२९ जुलै रोजी बारूळ, दि.३० जुलै रोजी शिराढोन आणि दि.३१ जुलै रोजी मारताळा येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाआरोग्य शिबीर पार पडणार आहेत.
या महाआरोग्य शिबिरात हृदयरोग तपासणी आणि औषधोपचार,अस्थिरोग,जनरल सर्जरी,बालरोग,कान,नाक,घसा, स्त्रीरोग,जनरल मेडिसिन,श्वसन विकार व क्षयरोग, संधीचे विकार,नेत्ररोग,रक्त शर्करा,ईसीजी आदी आजारांची तपासणी आणि औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत.
यावेळी शिबिरात औषधोपचार तपासणी व चाचणी आणि तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी अगदी मोफत करण्यात येणार आहे. या महाआरोग्य शिबिराचा लाभ कंधार-लोहा मतदारसंघातील जास्तीत जास्त रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन भारतीय जनता पार्टी कंधारच्या वतीने करण्यात आले आहे.