कंधार प्रतिनिधी:-
कंधार तालुक्यातील शिराढोण येथे सामाजिक कार्यकर्ते, शासकीय गुत्तेदार बालाजी रामराव पांडागळे यांनी समाजातील गोरगरीब कष्टकरी शेतमजूर दीनदुबळ्याचा आधार बनून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून शिराढोण व परिसरातील 70 विठ्ठल भक्तांना गेली चार वर्षे झाले मोफत दर्शन घडवून आणत आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथे श्री विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शनाची भक्तांना नेहमीच ओढ असते. शिराढोण येथील शासकीय गुत्तेदार असलेले बालाजी रामराव पांडागळे हे सामाजिक व धार्मिक वरती चे दानशूर व्यक्ती म्हणून शिराढोण परिसरात परिचित आहेत.
शिरढोण व परिसरात कोणते ही समाजकार्य होत असेल तर त्यामध्ये पांडागळे परिवारातील सदस्याचा नेहमीच जिक्रीने सहभाग असतो. त्यामध्ये वृक्षारोपण,रक्तदान शिबिर,नेत्र तपासणी, लग्नकार्य तसेच पंचक्रोशीतील कोणत्याही गावांमध्ये देवदेवत्यांच्या भंडाऱ्याचा कार्यक्रम असो अशा अनेक कार्यक्रमांमध्ये पांडागळे परिवारातील प्रत्येक सदस्यांचा यामध्ये सहभाग असतो.
प्रत्येक व्यक्ती हा सामाजिक कार्य करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदार हेतूने समाजामध्ये आपलं काम करत असतो.
मागील चार वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त शिराढोण परिसरातील विठ्ठल भक्तांना पंढरपूरला दर्शनासाठी घेऊन जातात. याही वर्षी त्यांनी शिराढोण व परिसरातील सत्तर भक्तांना सौखर्चाने दर्शनासाठी नेले. या सर्व भक्तांचे आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन झाले. त्यामुळे या सर्व भक्तांनी बालाजी रामराव पांडागळे यांचे आभार मानले.