पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीकडे पहिले पाऊल!: खा. अशोक चव्हाण

 

नांदेड, दि. २३ जुलै २०२४:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारताची संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल असल्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे त्यांनी स्वागत केले असून, शेतकरी, महिला, युवक, गरिब आणि मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा एक समतोल अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये शिक्षणाच्या सुविधा, रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि एमएसएमईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पायाभूत सुविधांना दिलेले भक्कम पाठबळ, गृहनिर्माण व ग्रामीण रस्त्यांसाठीचे निर्णय, विदेशी कंपन्यांच्या कर रचनेत पूरक बदल करून विदेशी गुंतवणुकीला अधिक चालना देण्याचा प्रयत्न, सर्व समाजघटकांच्या अपेक्षा ओळखून त्यांची पूर्तता करण्यावर दिलेला जोर, पुढील काळातील आव्हाने ओळखून संशोधन कार्याला चालना आदींमुळे यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *