हज व उमराह सर्व्हिसचा नागरिकांनी लाभ घ्यावा विक्रांत शिंदे यांचे आवाहन

 

प्रतिनिधी, कंधार

 

कंधार शहरात हज व उमराह सर्व्हिसचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शेकापचे मराठवाडा सरचिटणीस विक्रांत शिंदे यांनी हज व उमराह सर्व्हिसला भेट दिली. तसेच प्रसिद्ध व्यवसायिक सय्यद इसाक यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच हज व उमराह सर्व्हिसचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विक्रांत शिंदे यांनी केले.

यावेळी काँग्रेसचे लोहा विधानसभा पक्ष निरीक्षक संजय भोसीकर, शेकापचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख शेरुभाई, जनता दलाचे महेमुद पठाण, समीर चाऊस, मिर्झा जफर बेग, राम गोरे, एजाज भोसीकर, महेश पिनाटे, सदाम कंधारी, गिरीश मामडे, महेश पिनाटे, अजिमोद्दीन शेख, मंजूरअहेमद परदेसी, परदेसी मगदूम सर, मुस्लिम समाजातील अनेक मुफ्ती आणि मौलवीसह मोठ्या प्रमाणात हितचिंतकांची उपस्थिती होती.

प्रत्येक मुस्लिमाला आयुष्यात एकदा हज आणि उमरा करण्यासाठी मक्काच्या पवित्र मशिदीला भेट देण्याची इच्छा असते. तेथे जाण्यासाठी, प्रत्येक इच्छुक भक्त सर्वोत्तम आणि स्वस्त सेवा आणि सुविधा देणारी एजन्सी किंवा प्लॅटफॉर्म शोधत असतो. त्यामुळे जर तुम्ही सुरळीत, सोयीस्कर, जलद आणि परवडणाऱ्या हज आणि उमराह सेवा प्रदान करणारी एजन्सी शोधत असाल, तर तुम्ही हज आणि उमरा टूर सेवांसाठी आता आपल्या कंधार शहरातच ही सेवा सुरू केली असून सय्यद इसाक यांच्या अल-बुराख टूर्स अँड ट्रॅव्हल्सची हजी आणि उमराह सर्व्हिस, लोहा रोड पॉवर हाऊस जवळ सुरू करण्यात आली आहे.

ग्राहकांच्या समर्थन सेवेसह उमरा यात्रेकरूंसाठी परवडणारी आणि सर्वोत्तम पॅकेजेस प्रदान करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त, यात्रेकरू उमराह व्हिसासाठी अर्ज करू शकतात. तसेच विविध आणि विशेष सेवांमध्ये सर्वोत्तम ऑफर करण्यासाठी आम्ही पूर्ण उत्साही लोकांची समर्पित टीम आहोत. मक्का आणि मदिना या पवित्र स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांना सर्व उमराह आणि हज सेवा प्रदान करतो. या व्यतिरिक्त, ज्यांना काही शंका आहेत किंवा सेवांबद्दल अधिक माहिती हवी आहे, अशा सर्व यात्रेकरूंना आम्ही ग्राहक समर्थन सेवा प्रदान करत असल्याचे सय्यद इसाक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *