यवतमाळ ; प्रतिनिधी
यवतमाळ भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाचे कर्तव्यदक्ष जिल्हा संघटक गजानन गायकवाड यांनी द भारत स्काऊट आणि गाईड चळवळीतील सर्वोच्च लिडर ट्रेनर (स्काऊट) प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.”आंतरक्रियात्मक विश्लेषण हस्तपुस्तिका -मराठी अनुवाद” हा वैयक्तिक प्रकल्प सादर केल्यानंतर त्यांना लिडर ट्रेनर प्रमाणपत्र राष्ट्रीय कार्यालयाकडून प्राप्त झाले.
स्काऊट चळवळीत लिडर ट्रेनर प्रशिक्षणाला अत्यंत महत्व आहे. त्यांना या प्रशिक्षणासाठी राज्य प्रशिक्षण आयुक्त (स्काऊट)श्री. गोविंद केंद्रे,ज्येष्ठ लिडर ट्रेनर श्री. सुरेश लोहार, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त श्री. भगवान जामकर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या यशासाठी जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी (माध्य) श्री. प्रदिप गोडे, जिल्हा संघटक श्रीमती. मनिषा तराळे व सर्व स्टाफ यांनी अभिनंदन केले आहे. या प्रसंगी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुकाप्रमुख उपस्थित होते.शिक्षणक्षेत्रातील मान्यवर आणि स्काऊट-गाईड चळवळीत मान्यवरांनी त्याचेवर शुभेच्छांचा वर्षाव केला.