राष्ट्रपती दौरा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा

 

लातूर, दि. 23  : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित उदगीर दौऱ्याच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी बुद्ध विहार, सभास्थळसह इतर ठिकाणांची पाहणी केली.

प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, मंजुषा लटपटे, शरद झाडके, रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, जावेद शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सलीम शेख, कार्यकारी अभियंता देवेंद्र नीळकंठ, एम. एम. पाटील यांच्यासह भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भन्ते पय्यानंद, भन्ते नागसेन बोधी आणि विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती महोदया यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने विविध पथके स्थापन करण्यात आली असून प्रत्येक पथकावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सर्व पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीची माहिती घेवून त्याअनुषंगाने आवश्यक पूर्वतयारी लवकरात लवकर करावी. यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कुचराई करू नये. प्रत्येक पथकाने एकमेकांशी समन्वय ठेवून काम करावे. वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने सूचना दिल्या. बुद्ध विहार परिसरातील व्यवस्था, सभास्थळ, हेलिपॅड आदी ठिकाणच्या तयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला.
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *