कंधार/प्रतिनिधी
दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या१०३ व्या जयंतीनिमित्त मातोश्री मुक्ताई धोंडगे प्रतिष्ठाण कंधारचे सचिव तथा श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम धोंडगे आणि मातोश्री मुक्ताई धोंडगे प्रतिष्ठाण कंधारच्या अध्यक्षा प्रा.डाॅ.मनिषाताई पुरुषोत्तम धोंडगे यांच्या संकल्पनेतून “ज्ञानाचा सागर क्रांतिचा जागर ” या सदराखाली दि.२६ जूलै रोजी घेण्यात आलेल्या लहान गटातील इयत्ता १ ली ते ४ थी रंग भरण स्पर्धा व मोठ्या गटातील इयत्ता ५ वी ते ८ वी स्पर्धेत ५००० विद्यार्थी सहभागी झाले होते.सहभागी विद्यार्थ्यांना पॅड व पाणी बॉटल देण्यात आले.
२६ जूलै रोजी शहरासह तालुक्यातील पाच हजार विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. दि.२९ जूलै रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती इंग्लिश स्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव पेठकर तर प्रमुख अतिथी म्हणून विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोज धर्मापुरीकर उपस्थित होते.
मोठ्या गटातील प्रथम कु.प्राची वाळके छ.शंभुराजे इंग्लिश स्कूल,वर्ग ६ वी छ.शंभूराजे इंग्लिश मीडियम स्कूल कंधार व्दितीय-तेजस मधुकर राठोड ५ वी ग्रो अँड ग्रो स्कूल कंधार
तृतीय-माधवेंद्र बनसोडे मनोविकास विद्यालय ८ व उत्तेजनपर ऋषीकेश देविदास, छोट्या गटातील रंग भरण स्पर्धा परक्षेत प्रथम- कु.माहिरा बाबा शेख जि.प. प्रा.शाळा फुलवळ,व्दितीय क्रमांक कु.निधी नितिन टेकाळे मनोविकास प्राथमिक शाळा कंधार वर्ग दुसरा, तृतीय- कु.मानसी राजेश्वर उमाटे ४ थी ग्रो अँड ग्लो शाळा कंधार यांनी तर उत्तेजनपर कु.मैथिली मारोती हराळे वर्ग ४ था जि.प.बाचोटी कु.श्रावणी नारायण श्रीपतवार प्रियदर्शनी प्रा.शाळा कंधार कु.अलिशान जावेद शेख,कु.श्रेया दत्ता येवते छ.शंभूराजे इंग्लिश स्कूल कंधार
कु.नंदिनी श्रीकांत कागणे ग्रो अँड ग्रो स्कूल कंधार या चिमुकल्यांनी यश संपादन केले.गुणवंत विद्यार्थ्यांचा छ.शंभूराजे इंग्लिश मीडियम स्कूल कंधारच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.यावेळी प्रा.सुभाषराव मुत्तेपवार,प्रा.संर्यकांत जोंधळे इंग्लिश स्कूलचे कर्मचारी,विद्यार्थी पालक उपस्थित होते.सुत्रसंचलन चव्हाण मॅडम यांनी केले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.