कंधार ; प्रतिनिधी
व्यंकटेश्वर नगर अभिनवनगर येथील (मांगुळकर व लोव्हेकर यांच्या घराजवळ) व गल्ली-बोळातील रस्ते व मेन रोड रस्त्यावर येत असलेले बाभळीचे फांदे डोळ्याला व डोक्याला लागत आहे. शाळेला व ट्युशन ला येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे जीव घेणे झाले आहे. अनेक भागात रिकाम्या जागेमध्ये गांजर गवत सुद्धा वाढलेले आहे.
डास खूप झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन नागरिकांना व विद्यार्थ्यांना रस्ता मोकळा करून द्यावे अशी विनंती परशुराम केंद्रे सामजिक कार्यकर्ता कंधार यांनी तहसिलदार कंधार यांना केली आहे .