मुखेड: जग ग्लोबल वार्मिंगकडे जाते आहे. तापमान या उन्हाळ्यामध्ये असह्य होते. याच गतीने ग्लोबिंग वॉर्मिंग होत असेल तर मानवी जीवन असह्य होणार आहे. वृक्षतोड बगवत नाही. माणसाचा खून 302 पण झाडाचा खून विचारतो कोण? अशी अवस्था झाली. त्यामुळे वृक्षारोपण हा एक संस्कार झाला पाहिजे असे प्रतिपादन मुखेड भूषण जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य डॉ. दिलीपराव पुंडे यांनी केले. सुप्रभात मित्र मंडळ व शिवप्रसाद नर्सिंग इन्स्टिट्यूट यांच्यावतीने,वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय खात्यांचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त, नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले,
याप्रसंगी डॉ. दिलीप पुंडे बोलत होते. कार्यक्रमास शिवप्रसाद संस्थेचे विश्वस्त डॉ. वीरभद्र हिमगिरे, सुप्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, सचिव जीवन कवटीकवार, संघटक अशोक कोत्तावार, डॉ. आर.जी. स्वामी, उत्तम अण्णा चौधरी, नंदकुमार मडगुलवार, गोपाळ पत्तेवार, मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे पुढे म्हणाले की, प्रत्येकाने मुला-मुलीचा जन्म, नववधूचा गृहप्रवेश, आयुष्यातील अनेक सुख-दुःख प्रसंग आहेत, त्यासाठी प्रत्येकाने यावेळी वृक्षारोपण करावे. मरावे परी वृक्षरुपी उरावे ही सुद्धा संकल्पना राबवता येते.
एक कुटुंब एक झाड ही संकल्पना राबवली तर आपल्या राज्यात पर्यायाने देशात लाखो झाडे निर्माण होतील. आपल्याला फक्त दरडोई उत्पन्न माहित आहे आपल्या देशात दरडोई झाडाची संख्या अत्यल्प आहे. वृक्षारोपण ही प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी समजली पाहिजे, वृक्षारोपण एक चळवळ झाली पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी जनतेला आव्हान करताना डॉ. दिलीप पुंडे म्हणाले की, या राष्ट्रीय कार्यासाठी सर्वांनी हातभार लावला पाहिजे. आपल्याला जगायचं असेल तर वृक्ष लावा दारोदारी समृद्धी येईल घरोघरी. सर्वांनी या वृक्षदिंडीचे वारकरी व्हावेत असे त्यांनी आवाहन केले. डॉ. पुंडे यांनी यापूर्वी वैद्यकीय संस्था, जिप्सी मॉर्निंग ग्रुप व विविध संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हजारो वृक्ष लावण्यास प्रोत्साहित केले.
कार्यक्रमास शिवाजी कोणापुरे, दादाराव आगलावे, उत्तम कुलकर्णी, प्रवीण कवटीकवार, लक्ष्मीकांत चौधरी, बालाजी वट्टमवार, मनोज जाजू, दिनेश चौधरी यांच्यासह सुप्रभातचे सदस्य, शिवप्रसाद चे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव आगलावे यांनी केले तर आभार डॉ. शारदा हिमगिरे यांनी मानले.