शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे अग्रस्थानी *आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अथक प्रयत्नामुळे विष्णुपुरी प्रकल्पातील 12 पंप व उद्धरण नलिका बसविण्यासाठी 160 कोटी 64 लाखाच्या निधीस प्रशासकीय मान्यता

 

प्रतिनिधी.: कंधार 

कै.शंकरराव चव्हाण विष्णुपुरी सिंचन प्रकल्पातील 12 विद्युत पंप व उद्धरण नलिकाची अत्यंत बिकट अवस्था झाल्याने लोहा व कंधार तालुक्यातील हजारो शेतकरी सिंचनापासून वंचित राहत होते, याबाबत लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे याविषयी आवाज उठविला होता, या सिंचनाच्या समस्येमुळे लोहा तालुक्यातील 15 हजार 927 हेक्टर व कंधार तालुक्यातील 2100 हेक्‍टर जमीन सिंचनापासून वंचित राहून शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान होत होते ,धरण उशाशी पण शेतकरी उपाशी राहत असल्याने या भागातील बळीराजा आर्थिक व मानसिकदृष्ट्या हवालदिल झाला होता,

 

लोहा-कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे आवाज उठवला होता, कै. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे 12 विद्युत पंप व उद्धरण नलिका तात्काळ बदलण्यात येऊन नवीन विद्युत पंप व उद्धरणनलिका बसविण्याची मागणी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी अधिवेशनात करताच विद्युत पंप व उ उद्धरण नलिका दुरुस्तीसाठी 125 कोटीचा निधी तात्काळ मंजूर केला होता,जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाच्या दि. 29 जुलै 2024 च्या शासन निर्णयाद्वारे विष्णुपुरी प्रकल्पातील 12 विद्युत पंप व उद्धरण नलिकेसाठी विशेष दुरुस्ती अंतर्गत 160 कोटी 64 लाख 57 हजार 223 रुपये निधी कामांना प्रशासकीय मान्यता दिली असल्याने विष्णुपुरी प्रकल्पाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व नादुरुस्त झालेल्या 12 विद्युत पंप व उद्धरणनलिका आता नव्या कोऱ्या बसविल्या जाणार आहेत, आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी विष्णुपुरी प्रकल्पाच्या विद्युत पंप व उद्धरण नलिका हा शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न निकाली काढल्यामुळे शेतकरी बांधवात आनंदाचे वातावरण आहे,

 

मतदारसंघातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यात आ. श्यामसुंदर शिंदे हे अग्रस्थानी असल्याचे यावरून पहावयास मिळते , मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या हितासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे हे सदैव कटिबद्ध असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, विष्णुपुरी प्रकल्पाचा गंभीर प्रश्न आमदार शिंदे यांच्या माध्यमातून निकाली निघाल्यामुळे लोहा व कंधार तालुक्यातील शेतकरी बांधवातून आमदार शिंदे यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *